हरमनप्रीत भांगडा करत आली अन्…; जय शाहांकडून ट्रॉफी स्वीकारताना केलेल्या ‘त्या’ कृतेचे होतयं कौतुक

India Won Women’s World Cup 2025 | भारताच्या महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत महिला वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने कामगिरी केली आणि महिला संघाने वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. विजयानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय महिला संघाला वर्ल्डकप ट्रॉफी प्रदान केली. मात्र, जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेली, तेव्हा घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हरमनप्रीत ट्रॉफी घ्यायला गेली अन्…
आयसीसीचे चेअरमन जय शाह ट्रॉफी घेऊन स्टेजवर उभे होते. तेव्हा वर्ल्डकप ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर आलेली हरमनप्रीत कौर भांगडा करतच तिथे पोहोचली. त्यानंतर तिने जय शाह यांना वाकून नमस्कार केला आणि मग ही ट्रॉफी स्वीकारत एकच जल्लोष केला. यावरून त्याच्या नम्रतेचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Just see the SANSKAR
Harmanpreet tried to TOUCH feet of Jay Shah but he REFUSED & in fact, BOWED to her as she’s Nari Shakti of Bharat 🇮🇳
Then he gave the trophy & LEFT the stage ASAP after the mandatory photos
Recall a leader who was pushed off the stage by the RUDE Aussies… pic.twitter.com/wjLpT6nS9R
— PallaviCT (@pallavict) November 2, 2025
भारतीय संघाची दमदार सुरुवात
पहिल्या फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला शेफाली वर्मा आणि स्मृति मंधाना यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना ५८ चेंडूंत ४५ धावा करून बाद झाली. शफाली वर्माने ७८ चेंडूंत ८७ धावा फटकावल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
उपांत्य फेरीत शतक ठोकलेली जेमिमा रॉड्रिग्स या सामन्यात फक्त ३७ चेंडूंत २४ धावाच करू शकल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २९ चेंडूंत २० धावा करून क्लीन बोल्ड झाली. अमनजोत कौरने १४ चेंडूंत १२, तर ऋचा घोषने ३४ धावा केल्या. दीप्ति शर्मा ५८ धावांवर रनआऊट झाली.
भारताच्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने ९८ चेंडूत १०१ धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि १ षटकार होता. तर अॅनेरी डिर्कसेनने ३५, सन लुसने २५ आणि तंजीम ब्रिट्सने २३धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभव पत्करावा लागला. तर दक्षिण आफ्रिकेच्या आयबोंगा खाकाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. India Won Women’s World Cup 2025 |
हेही वाचा :
“H-1B फी वाढ हा फक्त ट्रेलर…खरी त्सुनामी अजून बाकी” ; रघुराम राजन नेमकं कोणत्या धोक्याविषयी बोलले?





