IND vs WI 3rd T20 : भारतीय महिला संघानं रचला इतिहास, मोडित काढला सर्वोच्च टी-20 धावसंख्येचा विक्रम…

India W vs West Indies W 3rd T20 : महिला संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. भारताने मालिकेतील शेवटचा सामना 60 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा विक्रम केला. संघानं स्वत:च्याच सर्वोच्च टी-20 धावसंख्येचा विक्रम मोडला. यावेळी स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांनी अप्रतिम कामगिरी केली. या दोघींनी अर्धशतके झळकावली. मंधानाने 77 आणि घोषने 54 धावांची खेळी केली.
वास्तविक, भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या कालावधीत संघानं 20 षटकांत 4 गडी गमावून 217 धावा केल्या. ही महिला टीम इंडियाची सर्वात मोठी टी-20 क्रिकेटमधील धावसंख्या ठरली. यादरम्यान स्मृती मानधना आणि उमा छेत्री सलामीला आल्या. मात्र उमा शून्यावर बाद झाली. तर मंधानाने 47 चेंडूत 77 धावा केल्या. तिने 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. रिचा घोषने 21 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. तिने 3 चौकार आणि 5 षटकार मारले. राघवी बिष्टने नाबाद 31 धावांचे योगदान दिलं.
𝙈𝙞𝙡𝙚𝙨𝙩𝙤𝙣𝙚 𝙐𝙣𝙡𝙤𝙘𝙠𝙚𝙙 🔓
How impressive was that from #TeamIndia! 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/fhQRIWAIU9
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
महिला टीम इंडियाने मोडला स्वतःचाच विक्रम…
भारतीय महिला संघाची T20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या 201 होती. युएईविरुद्ध संघानं ही धावसंख्या उभारली होती. त्यादरम्यान भारताने 20 षटकात 5 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. मात्र आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. टीम इंडियाची सर्वात मोठी धावसंख्या 217 धावा ठरली आहे. यापूर्वी भारताने इंग्लंड महिलांविरुद्धच्या सामन्यात 198 धावा केल्या होत्या. ही संघांची तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
स्मृती मंधाना ठरली मालिकावीर..
भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 60 धावांनी पराभव केला. यासह मालिकाही खिशात टाकली . स्मृती हिला मालिकावीर खेळाडू म्हणून निवडण्यात आले. या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती अव्वल स्थानावर राहिली. मंधानाने 3 सामन्यात तीन अर्धशतकासह 193 धावा केल्या.





