HARDIK PANDYA । अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेट स्टार हार्दिक पांड्या यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. आता नताशापासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक एका गायिकेसोबत डेट करत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर याच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
गायिका जास्मिन वालियासोबत हार्दिक डेट करत असल्याचा अंदाज युजर्स लावत आहे. हार्दिक आणि जास्मिन दोघेही ग्रीसमध्ये एकत्र व्हेकेशन एन्जॉय करत असल्याच्याही अफवा आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी नताशापासून वेगळे झाल्यानंतर हार्दिक नेमका कोणाला डेट करत आहे? असा प्रश्नही युजर्स विचारत होते. अशात त्याचे नाव या गायिकेसोबत जोडले जात आहे. हार्दिक आणि जास्मिनने इंस्टाग्रामवर एकाच पूलमधून फोटो शेअर केल्यावर अटकळ सुरू झाली.
फोटोंच्या पार्श्वभूमीत ग्रीक व्हॅली दिसत आहे, जस्मिनने निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केलाय, तर निळ्या रंगाचा शर्टही घातला आहे. ती पूलजवळ स्टायलिश पोज देताना दिसली. तिने स्ट्रॉ हॅट आणि ओव्हरसाईज सनग्लासेससह आपला लूक पूर्ण केला. यानंतर काही वेळातच हार्दिकने त्याच टॅंकजवळ फिरतानाचा व्हिडिओही पोस्ट केला. व्हिडिओमध्ये, हार्दिक क्रीम रंगीत पँट, पॅटर्नचा शर्ट आणि सनग्लासेसच्या आरामदायक पण फॅशनेबल पोशाखात दिसत होता.
View this post on Instagram
जस्मिनने हार्दिकचा हा व्हिडिओ लाईक केल्यामुळे आता त्यांच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. जस्मिन आणि हार्दिकच्या पोस्टची तीच पार्श्वभूमी पाहून चाहते दोघेही डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र या चर्चांवर दोघांकडूनही कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.