MI vs RCB : आरसीबीने मुंबईला त्यांच्याच घरात केलं चारीमुंड्या चित, शेर्फेन रदरफोर्डची झुंज ठरली अपयशी
MI vs RCB : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

MI vs RCB Royal Challengers Bengaluru won by 18 runs : वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या २० व्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीने २४१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईने २२२ धावांतच गुडघे टेकले. या विजयासह आरसीबीने हंगामातील तिसरा विजय नोंदवला, तर मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला. आरसीबीच्या विजयात फिलिप सॉल्टने सर्वाधिक ७८ धावांचे योगदान देत महत्त्वाची भूमिका बजावली.
या हाय-व्होल्टेज लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २४० धावांचे विशाल लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत ५ बाद २२२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अशा प्रकारे आज वानखेडे स्टेडियमवर धावांचा महापूर पाहायला मिळाला.
Back to winning ways 👏
A statement victory for #RCB at the Wankhede as they defeat #MI by 1️⃣8️⃣ runs ❤️
Scorecard ▶️ https://t.co/q1MGJfD2d8#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/n2RaM9oZyk
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
आरसीबीच्या टॉप-ऑर्डरचा धमाका –
Innings Break!
5️⃣0️⃣s from the top three batters sail @rcbtweets to 240/4 🔥
Will @mipaltan chase it down? 🤔
Scorecard ▶️ https://t.co/q1MGJfD2d8#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRCB pic.twitter.com/qrTm8zcXWJ
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
आरसीबीच्या या ऐतिहासिक डावात सलामीवीर फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी पाया रचला. साल्टने ३६ चेंडूंत ७८ धावांची तुफानी खेळी केली, तर कोहलीने ३८ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारने केवळ २० चेंडूंत ५३ धावा कुटून मुंबईच्या गोलंदाजांना हतबल केले. डावाच्या अखेरीस टिम डेव्हिडने १६ चेंडूंत ३४ धावा जोडून धावफलक २४० पर्यंत नेला. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
रदरफोर्डची एकाकी झुंज अन् रोहित ‘रिटायर हर्ट’ –
Fighting till the very end 🫡
Sherfane Rutherford with a fine 26-ball HALF-CENTURY 👏
Updates ▶️ https://t.co/q1MGJfD2d8#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRCB | @mipaltan pic.twitter.com/0RuE55TVeb
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा १९ धावांवर असताना दुखापतीमुळे ‘रिटायर हर्ट’ होऊन मैदाबाहेर गेला, ज्यामुळे मुंबईला मोठा धक्का बसला. सूर्यकुमार यादव (३३) आणि हार्दिक पांड्या (४०) यांनी प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले. शेवटी शेरफेन रदरफोर्डने ३१ चेंडूंत ७१ धावांची नाबाद स्फोटक खेळी करत मुंबईला विजयाच्या जवळ नेले, पण अखेर आरसीबीने १८ धावांनी बाजी मारली.





