Hardik Secret Marriage : हार्दिक पंड्याने गुपचूप उरकलं दुसरं लग्न? माहिकाच्या भांगेतील कुंकवाचा फोटो होतोय व्हायरल
Hardik Secret Marriage : हार्दिकने माहिकासोबत गुपचूप लग्न उरकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Hardik Pandya Mahieka Sharma Secret Marriage Rumors : इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) सध्या आयपीएल २०२६ (IPL2026) संपल्यापासून क्रिकेटमधून विश्रांतीवर आहे. तो भारताच्या चालू आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्याचा भाग नाहीये. या मोकळ्या वेळात हार्दिक आपली मैत्रीण माहिका शर्मा हिच्यासोबत ‘क्वालिटी टाईम’ घालवत आहे. मात्र, यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अत्यंत धक्कादायक फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, हार्दिकने माहिकासोबत गुपचूप लग्न उरकल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Hardik Secret Marriage)
व्हायरल फोटोत दिसलं भांगेत कुंकू आणि कपाळावर टिळा – (Hardik Secret Marriage)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने व्हायरल होत असलेला हा फोटो नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, या फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका एका वृद्ध महिलेसोबत उभे राहून पोझ देताना दिसत आहेत. मात्र, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते माहिका शर्माच्या भांगात दिसणाऱ्या कुंकवाने.
तसेच हार्दिकच्या कपाळावरही एक मोठा टिळा लाललेला दिसत आहे. दोघांनी खरोखरच लग्न केले आहे की नाही, याबद्दल अद्याप या कपलने (जोडीने) कोणताही अधिकृत खुलासा किंवा घोषणा केलेली नाही. मात्र, इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वर चाहत्यांनी त्यांना थेट लग्नाबद्दल प्रश्न विचारत शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
Rare footage of Hardik Pandya and Mahieka Sharma with Mahieka’s mom ❤️ pic.twitter.com/TCtBSTbMJY
— imjobless 🇮🇳 (@sam_jobless) June 27, 2026
हार्दिक पंड्या ‘सरप्राईज’ देण्यात माहीर – (Hardik Secret Marriage)
A recent viral image has sparked massive rumors and speculation online, suggesting that Indian all-rounder Hardik Pandya may have secretly tied the knot with Mahika Sharma. Is it true?#HardikPandya #MahikaSharma #CricketRumors pic.twitter.com/22nx6BunKo
— Crictoday (@crictoday) June 27, 2026
हार्दिक पंड्या वैयक्तिक आयुष्यात असे मोठे सरप्राईज देण्यात नेहमीच माहीर राहिला आहे. यापूर्वी २०२० मध्ये जेव्हा त्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविचसोबत लग्न केले होते, तेव्हाही सुरुवातीला त्याने आपले नाते गुप्त ठेवले होते आणि अचानक घरातच लग्न उरकून चाहत्यांना धक्का दिला होता. हार्दिक आणि नताशाला अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. परंतु, २०२४ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. Hardik Secret Marriage
दोघांनी अगस्त्यचा सांभाळ मिळून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अगस्त्य कधी नताशासोबत तर कधी हार्दिकसोबत दिसतो. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत अगस्त्य हा अनेक ठिकाणी हार्दिक आणि माहिका शर्मासोबतही एकत्र स्पॉट झाला आहे. आता या नवीन व्हायरल फोटोच्या सत्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (Hardik Secret Marriage)





