Hardik Pandya Trade : हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला ठोकणार रामराम? ‘या’ दोन मालकांनी अंबानींच्या टीमसोबत रात्रीत केली मोठी बैठक
Hardik Pandya Trade : मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबई संघासोबत आपले नाते संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहे.

Hardik Pandya IPL 2027 Trade Rumors : आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी ट्रेडिंग विंडो खुली होताच क्रिकेट वर्तुळात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांच्या मेगा ट्रेडनंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबई संघासोबत आपले नाते संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहे. आयपीएलचे माजी विजेते असलेल्या केकेआर आणि राजस्थान रॉयल्स या दोन बड्या फ्रँचायझींनी हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
केकेआर आणि मुंबई इंडियन्स व्यवस्थापनात गुप्त चर्चा –
‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, केकेआरचे उच्च व्यवस्थापन आणि मुंबई इंडियन्सचे मालक यांच्यात हार्दिकच्या ट्रेडबाबत अनेक फेऱ्यांची चर्चा झाली आहे. हार्दिकचे मुंबईत पुनरागमन फारसे यशस्वी ठरले नाही आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ केवळ एकदाच प्लेऑफमध्ये पोहोचू शकला.
केकेआरचा अजिंक्य रहाणे हा कामचलाऊ कर्णधार होता आणि या हंगामानंतर त्याला रिलीज केले जाणार हे स्पष्ट आहे. रिंकू सिंग अजून कप्तानीसाठी पूर्णपणे तयार नसल्याने, हार्दिक जर केकेआरमध्ये आला तर थेट त्याच्याकडेच संघाचे कर्णधारपद सोपवले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, हा ट्रेड निव्वळ पैशांच्या स्वरूपात होणार की खेळाडूच्या बदल्यात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🚨 KKR REALLY SHOWING INTEREST FOR HARDIK PANDYA 🔥
– Reports say Hardik Pandya is set to leave Mumbai Indians after a tough stint with limited playoff success
– KKR and Rajasthan Royals have already reached out to MI for a potential mega trade or cash deal
KKR talks are heating… pic.twitter.com/PMH8j3LFr1— Venky Mama (@venkymama100) June 23, 2026
राजस्थानची मुंबईला ‘यशस्वी जैस्वाल’च्या बदल्यात मोठी ऑफर –
🚨 RAJASTHAN ROYALS RULE THE IPL TRADE WINDOW 🚨
Last Year : Sanju Samson was traded to CSK, and in return they brought their prime all-rounders, Ravindra Jadeja and Sam Curran, into the squad. 🫡
This Year : This year as well, there are efforts to trade Yashasvi Jaiswal to… pic.twitter.com/aqiERkLv0G
— lndian Sports Netwrk (@IS_Netwrk29) June 22, 2026
दुसऱ्या बाजूला, राजस्थान रॉयल्सनेही हार्दिकला आपल्या गोटात ओढण्यासाठी मुंबई इंडियन्सला एक धक्कादायक ऑफर दिली आहे. राजस्थानने आपला स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या बदल्यात हार्दिक पंड्याला ट्रेड करण्याचा प्रस्ताव मुंबईसमोर ठेवला आहे.
परंतु, राजस्थानचा संघ भविष्यातील दीर्घकालीन कर्णधार म्हणून आसामच्या रियान परागकडे पाहत आहे. त्यामुळे हार्दिकला राजस्थानमध्ये कप्तानी मिळणे कठीण आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, खेळाडूच्या संमतीशिवाय कोणतीही फ्रँचायझी थेट ट्रेड करू शकत नाही. आता या संपूर्ण हाय-प्रोफाइल ड्रामामध्ये हार्दिक पंड्या शेवटी कोणता निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





