Ireland Beat India : १७ वर्षांचा इतिहास बदलला! आयर्लंडचा भारतावर पहिलावहिला ऐतिहासिक विजय; जय मुंदडाची कमाल
Ireland Beat India : २००९ पासून म्हणजेच गेल्या १७ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आयर्लंडने भारताला कोणत्याही फॉरमॅटमध्ये हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Ireland Beat India 1st T20I Belfast Jay Mundra : टीम इंडियाने आयर्लंडला हलक्यात घेण्याची चूक केली आणि त्याचा मोठा फटका बसला आहे. बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात आयर्लंडने भारताचा ३४ धावांनी दणदणीत पराभव केला. २००९ पासून म्हणजेच गेल्या १७ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आयर्लंडने भारताला कोणत्याही फॉरमॅटमध्ये हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दोन्ही संघांत ८ सामने झाले होते आणि सर्व भारताने जिंकले होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या जागी नवा कर्णधार बनलेल्या श्रेयस अय्यरच्या पहिल्याच सामन्यात भारताला हा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला.
५१ वर ४ बाद; तरीही आयर्लंडने ठोकल्या १८२ धावा!
टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात अर्शदीप सिंग आणि दुखापतीनंतर परतलेल्या हर्षित राणाने खराब केली होती. अवघ्या ५१ धावांवर आयर्लंडचे ४ मुख्य फलंदाज तंबूत परतले होते. परंतु, येथून आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकर (५० धावा) आणि गॅरेथ डेलानी (४९ धावा) यांनी खिंड लढवली. या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरावर आयर्लंडने ९ बाद १८२ धावांचा आव्हानात्मक स्कोर उभा केला. भारताकडून हर्षित राणाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले, तर अर्शदीप आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
𝗔 𝗥𝗔𝗝𝗔𝗦𝗧𝗛𝗔𝗡𝗜 𝗕𝗢𝗬 𝗖𝗥𝗘𝗔𝗧𝗘𝗦 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗔𝗚𝗔𝗜𝗡𝗦𝗧 𝗜𝗡𝗗𝗜𝗔 ✨
Meet Jai Moondra.
– Born and brought up in Rajasthan, India 🇮🇳
– Moved to Ireland in 2021 for better opportunities
– Played club cricket in Ireland
– Makes his debut today v his country of… pic.twitter.com/i1me54ScNF— Cricketangon (@cricketangon) June 26, 2026
राजस्थानच्या जयने पहिल्याच चेंडूवर संजूचा उडवला त्रिफळा –
First ball wicket to start the International Career for Indian 🇮🇳 Born Jai Moondra.. What a start for him 👏 #IREVIND pic.twitter.com/JtC9diFm6s
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) June 26, 2026
प्रत्युत्तरात १८३ धावांचा पाठलाग करताना भारताची दाणादाण उडाली. आयर्लंडकडून पदार्पण करणाऱ्या राजस्थानच्या जय मुंदडाने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच चेंडूवर स्टार फलंदाज संजू सॅमसनला (५) क्लीन बोल्ड करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर दुसरा नवखा गोलंदाज मॅट होलार्डने इशान किशन, कर्णधार श्रेयस अय्यर (३) आणि वॉशिंग्टन सुंदर (९) यांना स्वस्तात बाद करून भारताचे कंबरडे मोडले.
सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या २० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची तुफानी खेळी केली, पण तो बाद झाल्यावर संकट वाढले. शिवम दुबे (२५) आणि अक्षर पटेल (१५) बाद होताच भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपल्या आणि टीम इंडिया १९ व्या ओव्हरमध्ये १४८ धावांवर ऑलआऊट झाली. आयर्लंडसाठी मॅथ्यू हम्फ्रीज आणि मॅट होलार्डने प्रत्येकी ३, तर जय मुंदडाने २ विकेट्स घेत इतिहास रचला.





