Rekha and Amitabh Bachchan : ‘हर मुलाकात…’ रेखाच्या शायरीची सोशल मीडियावर तुफान चर्चा; जुन्या नात्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा?
Rekha and Amitabh Bachchan : या व्हिडिओमध्ये रेखा शायरी सांगताना दिसत आहे. या शायरीच्या शब्दांमुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे नाते जोडले जात आहे.

Rekha and Amitabh Bachchan : बॅालिवूडची एव्हरग्रीन ब्यूटी रेखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेलबर्न येथे आयोजित इंडियन फिल्म फेस्टिव्हलला रेखाने हजेरी लावली. या फेस्टिव्हलमध्ये तिचा अनोखा अंदाज पुन्हा पाहायला मिळाला. येथे एका कार्यक्रमात बोलताना रेखाने एक शायरी सादर केली. नेटकऱ्यांनी या शायरीचे कनेक्शन महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडले आहे.
मेलबर्ग येथे आयोजित या इंडियन फिल्म फेस्टिव्हलला बॅालिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यामध्ये विजय वर्मा, पंकज त्रिपाठी, ऋषभ शेट्टी सहभागी झाल्याचे बघायला मिळाले. या फेस्टिव्हलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यातीलच एक व्हिडिओ रेखाचा असून, या व्हिडिओमध्ये रेखा शायरी सांगताना दिसत आहे. या शायरीच्या शब्दांमुळे अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे नाते जोडले जात आहे.
‘हर मुलाकत का अंजाम जुदाई क्यों है, अब तो यही बात सताती है हमे! या एका वाक्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा महापुर आला आहे. या वाक्यात कुठेही रेखा यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. किंवा तसा संदर्भही देलेला नाही. मात्र, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांचे नाव अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडले आहे.खरंतर अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले. या दोघांच्या त्यावेळी अफेअरच्या चर्चा रंगत असायच्या. मात्र दोघांनीही स्पष्टपणे कधीही या चर्चांवर उघडपणे भाष्य केले नाही.
Rekha turned Pankaj Tripathi from a Hindi-medium student into an English-medium. When Rekha is the teacher, whether you’re tall or short, everyone becomes an obedient student. 🤭
Actually, Rekha and actor Pankaj Tripathi attended an event organized by the Indian community in… pic.twitter.com/V5eIPuNzjq— Dollar (@arunkunal) August 15, 2026
याअगोदर मेलबर्नमधील पंकज त्रिपाठी आणि रेखा यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन्ही कलाकारांनी एकत्र मंचावर हजेरी लावली. विशेष म्हणजे मेलबर्नमध्ये रेखा यांनी फाडफाड इंग्रजीत भाषण केले. त्यानंतर पंकज त्रिपाठी आले आणि ते जे काही बोलले त्यानंतर एकच हशा पिकला.






