Mirzapur The Movie Teaser : पूर्वांचल पुन्हा धगधगणार! ‘मिर्झापूर’ मोठ्या पडद्यावर; धमाकेदार टीझर रिलीज
Mirzapur The Movie Teaser : कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना भैय्या यांच्यात मिर्जापूरच्या सिंहासनासाठी रक्तरंजित संघर्ष रंगताना दिसणार आहे.

Mirzapur The Movie Teaser : चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. ‘मिर्झापूर’चे विश्व पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे मिर्जापूर वेबसिरीजला चाहत्यांनी भरभरून दाद दिली होती. तशीच मिर्जापूर द मुव्हीला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (Mirzapur The Movie Teaser)
कालीन भैय्या, गुड्डू आणि मुन्ना भैय्या यांच्यात मिर्जापूरच्या सिंहासनासाठी रक्तरंजित संघर्ष रंगताना दिसणार आहे. यावेळी केवळ सत्ता मिळवण्याची लढाई नाही तर स्वतःचे साम्राज्य उभारण्याचे महायुद्ध असणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. (Mirzapur The Movie Teaser)
हेही वाचा : Ram mandir donation: राम मंदिर देणगी वाद: सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस दिला नकार
अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना पूर्वांचलच्या क्रूर आणि सत्तासंघर्षाने भरलेल्या जगात घेऊन जाणार आहे. या जगात काही नवीन कलाकरांची देखील एन्ट्री झाले आहे. त्यांचीही झलक टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये केवळ नवीन पात्रांची ओळख करून दिली नसून, कथानकातील अनेक महत्त्वाचे बारकावेही उलगडले आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Mirzapur The Movie Teaser)
मिर्जापूरच्या जगतात पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमारची एन्ट्री झाली असून तो ‘बबलू पंडित’च्या भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेते रवी किशन देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा २०१८ मधील आलेल्या सीझन १ मधील घडलेल्या घटनावर आधारित असल्याचे दिसते. कालीन भैय्या आपल्या सिंहासनाच्या वारसाबाबत चिंतेत असताना, गुड्डू पंडित आणि त्याचे साथीदार मिर्झापूरचे साम्राज्य उलथवण्याच्या तयारीत असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. (Mirzapur The Movie Teaser)
‘मिर्झापूर: द मूव्ही’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू, जितेंद्र कुमार, रवी किशन यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Mirzapur The Movie Teaser)
हेही वाचा : Cocktail 2: ‘कॉकटेल 2’साठी कुणी घेतलं सर्वाधिक मानधन? शाहिद, क्रिती आणि रश्मिकाच्या फीचा आकडा आला समोर





