Nagar | अत्याचारातील आरोपींना फाशी द्या

राहुरी, (प्रतिनिधी): महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांचा निषेधार्थ राहुरीत आज महिलांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा डाॅ. उषाताई तनपुरे यांनी केली.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घटनेच्या निषेध नोंदविण्यासाठी आज राहुरी नगरपरिषदच्या माजी नगराध्यक्षा डाॅ. उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी एक.ित्रत येऊन तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले.
बदलापूर येथील तीन ते चार वर्षांच्या बालिकांवर अत्यंत अमानुषपणे अत्याचार करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील जनतेमध्ये व विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही घटना राज्याला काळीमा फासणारी आहे.
जनतेच्या व विशेषतः महिलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालविणे, तपासासाठी एसआयटी. स्थापन करणे, तपासावर वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शारदा खुळे, वैशाली तनपुरे, अपर्णा ढमाळ, वृषाली भुजाडी, इंदुमती आमटे, वृषाली तनपुरे, आश्विनी कोहकडे, राधा साळवे, नंदा उंडे, निर्मला तनपूरे, बबई माने, वंदना शिरसाठ, अश्विनी कुमावत,
परवीन सय्यद, सांगीता आहेर, गायत्री जोशी, श्रद्धा तनपुरे, सविता खंडागळे, ज्योती वेताळ, संगिता धनवटे, आशा शेळके, सुनिता धनवटे, वंदना धनवटे, सुमन धनवटे, रेखा धनवटे, अर्चना धनवटे, अर्चना खामकर, रेणूका वेताळ, आशा कोरडे, सविता कानडे, विमल कदम आदी महिला उपस्थित होत्या.





