Nagar | बदलापूर प्रकरणातील नराधमाला चौकात फाशी द्या

पारनेर, (प्रतिनिधी) – बदलापूर प्रकरणातील नराधमाला चौकात फाशी द्या, अशी मागणी युवासेना शिवबा संघटना व शिवसेनेने पोलिसांकडे केली आहे.
बदलापूर येथे दोन चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडते अन् फिर्याद घेण्यासाठी पीडित कुटुंबाला रात्री १२ पर्यंत बसवून ठेवले जाते. याचा संताप संपूर्ण राज्यात उमटला आहे. न्याय व्यवस्था अतिशय कुचकामी झालेली आहे.
कोणालाही कायद्याची भीतीच राहिली नाही म्हणून सातत्याने असले प्रकार घडत असल्याचे युवासेना तालुका प्रमुख व शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यानी सांगितले.
सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. मग त्याला तातडीने फाशी का देत नाही, अशी भावना शिवसेना नेते संतोष येवले यानी व्यक्त केली.
आरोपीला तातडीने शिक्षा देण्यात यावी यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल शेटे, संतोष येवले ,सखाराम उजगरे,सुभाष भोसले,राजु लाळगे,साहेबराव पानमंद,संतोष साबळे,बाबाजी शिरोळे,राहुल तामखडे,श्रीधर गाडीलकर,मछिंद्रजी माळी,शिवाजी लाळगे,किरण सुपेकर,मोहन पवार, नवनाथ खामकर आदी उपस्थित होते.





