Nagar | महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक

पारनेर, (प्रतिनिधी) – महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यावर मात करण्यासाठी गावागावांतील महिलांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले असून त्याचा लाभ प्रत्येक महिलेस मिळाला पाहिजे.
रक्तदान शिबिरात तरुणांनी सहभागी होऊन रक्ताच्या दानाबरोबरच विमा कवचाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंकेे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिरास कर्जुलेहर्या व पोखरी येथे मोठया उत्साहात प्रारंभ झाला.
दि.१९ ते २९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य यज्ञामध्ये महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्जुले हर्या व पोखरी येथे शिबिरांना प्रारंभ झाल्यानंतर राणीताई लंके यांनी दोन्ही ठिकाणी भेटी देऊन महिला तसेच रक्तदात्यांची भेट घेऊ विचारपूस केली.
दुपारच्या वेळी खा. नीलेश लंके यांनीही दोन्ही ठिकाणी भेटी देऊन माहिती घेतली. दोन्ही ठिकाणी रक्तदाते तसेच तपासणी करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
यावेळी दीपक लंके, बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे, उपसभापती बापूसाहेब शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, सुवर्णा धाडगे, रा. या. औटी, मोहनराव रोकडे, अॅड. राहुल झावरे, संदीप चौधरी, महेंद्र गायकवाड, चंद्रभान ठुबे, डॉ. दीपक आहेर, लकी कळमकर, रविंद्र राजदेव,
अशोक आंधळे, बबन आंधळे, शशीकांत आंधळे, दत्ता येवले, पर्वती चिकणे, बापू ठुबे, शंकर कासुटे, मंगेश आंधळे, मनोज शिंदे, राजेंद्र तराळ, छाया कोकाटे, स्वाती उंडे, भागुजी झावरे, बबलू झावरे, किरण तराळ, प्रसाद नवले,
अमोल उगले, दत्तात्रय साळुंके, बाबू आंधळे, सतीश पवार, बाळासाहेब शिंदे, जयराम आहेर, पांडूरंग आहेर, नवनाथ मोरे, धनंजय गुंजाळ, अविनाश मोरे, भाऊसाहेब कोकाटे, संजय काशीद, भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.
ब्रेस्ट कॅन्सरसाठी जनजागृती हवी
ग्रामीण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण मोठया प्रमाणावर आढळत असून त्यावर मात करणे ही काळाची गरज आहे.
त्याच हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, सभासद यांनी जास्तीत-जास्त महिलांना या शिबिराचा लाभ कसा होईल, याची काळजी घ्यावी. रक्तदात्यांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. राणीताई लंके मा. जि. प. सदस्या





