Handshake controversy। आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता असताना, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. दरम्यान, या वादावर आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना थरूर यांनी, पाकिस्तानविरुद्धच्या भावना समजण्यासारख्या असल्या तरी, खेळाची भावना राजकारण आणि लष्करी संघर्षापासून वेगळी ठेवली पाहिजे” असा महत्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे. शशी थरूर यांनी पुढे बोलताना,”वैयक्तिकरित्या, मला वाटते की जर आपण पाकिस्तानवर इतके रागावलो आहोत, तर आपण अजिबात खेळायला नको होते. पण जर आपण खेळत आहोत, तर आपण खेळाच्या भावनेनुसार खेळायला हवे होते आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करायला हवे होते. आम्ही हे आधी १९९९ मध्ये कारगिल युद्ध चालू असताना केले होते. ज्या दिवशी आपले सैनिक देशासाठी आपले प्राण गमावत होते, त्याच दिवशी आम्ही इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळत होतो. तेव्हाही आम्ही त्यांच्याशी हस्तांदोलन केले होते, कारण खेळाची भावना वेगळी असते आणि देश किंवा सैन्यांमधील चालू संघर्षावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. हेच माझे मत आहे.”असे महत्वाचे विधान त्यांनी यावेळी केले. ‘दोन्ही बाजूंनी दिसून येणारा खेळाडूभावाचा अभाव’ Handshake controversy। काँग्रेस नेने शशी थरूर पुढे म्हणाले,”दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांमधून खेळाडूभावाचा अभाव दिसून येतो.” तसेच “जर पाकिस्तानी संघाने आधी अपमानित झाल्यानंतर दुसऱ्यांदा आमचा अपमान केला असेल तर हे दोन्ही बाजूंमध्ये खेळाडूभावाचा अभाव असल्याचे दिसून येते.” आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया कप सुपर फोर सामन्यादरम्यान (२१ सप्टेंबर) पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्या अनुचित वर्तनाबद्दल अधिकृत तक्रार दाखल केली. बीसीसीआयने ही तक्रार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे पाठवली. भारतीय संघाने दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. Handshake controversy।