पुणे शहरात हडपसर सर्वात मोठा मतदारसंघ; 6,25,675 मतदार

पुणे – जिल्हा प्रशासनाने पुरवणी मतदार यादीसह अंतिम मतदार प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांत मोठा मतदारसंघ हा हडपसर असून या मतदारसंघात 6 लाख 25 हजार 675 मतदार आहेत. तर कसबा पेठ हा विधानसभा सर्वांत लहान मतदारसंघ असून येथे 2 लाख 83 हजार 635 मतदार आहे.
अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार संख्या ४५ लाख ७९ हजार २७८, तर महिला मतदार संख्या ४२ लाख ६९ हजार ५९९ इतकी आहे. तृतीयपंथी मतदार संख्या ८०५ इतकी आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण मतदारसंख्या 33 लाख 45 हजार 535 इतकी होती. त्यामध्ये आता 35 हजार 849 ने वाढ होऊन मतदारसंख्या 33 लाख 81 हजार 384 इतकी झाली आहे.
मतदारसंघ – मतदारसंख्या
वडगाव शेरी – 5,03,539
शिवाजीनगर – 2,95,117
कोथरुड – 4,40,557
खडकवासला – 5,76,505
पर्वती – 3,60,974
हडपसर – 6,25,675
पुणे कॅन्टोन्मेंट – 2,95,382
कसबा पेठ – 2,83,635





