Guwahati Masters badminton 2023 : भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा व तनिषा क्रॅस्टो या जोडीने रविवारी येथे पार पडलेल्या गुवाहाटी मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम लढतीत तैपेयीच्या सुंग शाऊ युन व यु चेन हुई या जोडीचा 21-13,21-19 असा अवघ्या 40 मिनिटात पराभव केला.
भारताच्या अश्विनी व तनिषा (Ashwini Ponnappa-Tanisha Crasto) या जोडीने नुकत्याच पार पडलेल्या सइद मोदी करंडक स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले होते. त्यावेळी त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, या स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवत यंदाच्या मोसमातील सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. हे या जोडीचे सुपर सीरीज 100 स्पर्धांमधील तिसरे विजेतेपद ठरले आहे.
#BBL13: ‘बिग बॅश लीग’मध्ये 6 व्या षटकामध्येच रद्द करावा लागला सामना; जाणून घ्या, नेमकं काय घडलं….
अश्विनी 34 वर्षांची असून तीने 20 वर्षीय तनिषासह खेळताना वय हा केवळ एक अंक आहे हेच सिद्ध केले. यंदाच्या वर्षी जानेवारीत या दोघींनी पहिल्यांदा भारताकडून महिला दुहेरीत सहभाग घेतला होता. आता नुकत्याच चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही या दोघींनी दुहेरीत सहभाग घेतला होता.