IPL 2025 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू अचानक मायदेश परतला

IPL 2025 Kagiso Rabada has returned to South Africa : आयपीएल २०२५ च्या हंगामात पंजाब-दिल्ली वगळता आतापर्यंत जवळपास प्रत्येक संघाचे तीन सामने झाले आहे. यंदाच्या हंगामातील १४ व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने आरसीबीचा ८ विकेट्सने पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयानंतर, गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अचानक संघ सोडून मायदेशी परतला आहे. या मागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया.
वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल २०२५ च्या मध्यात दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे. रबाडाने या हंगामात २ सामने खेळले आहेत. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरला नाही. गुजरातचा कर्णधार शुबमन गिलही म्हणाला होता की, रबाडा वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यात खेळत नाहीये.
कागिसो रबाडा वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला –
#BREAKING: Gujarat Titans pacer Kagiso Rabada has returned to South Africa from the ongoing season of IPL 2025 due to some personal reasons. “Kagiso Rabada has returned to South Africa to deal with an important personal matter,” said a statement by Gujarat Titans. Rabada had… pic.twitter.com/cQxKtTbsj4
— IANS (@ians_india) April 3, 2025
गुजरात टायटन्सने म्हटले आहे की, ‘कागिसो रबाडा एका महत्त्वाच्या घरगुती समस्येचे निराकरण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत परतला आहे.’ रबाडाने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये १-१ विकेट घेतल्या होत्या. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज कधी परतणार? याबद्दल कोणतेही अपडेट मिळालेले नाही. गुजरातचा पुढील सामना ६ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. या हंगामात आतापर्यंत जीटीने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. यासह पॉइंट्स टेबलमध्ये ते चौथ्या स्थानावर आहेत.
कागिसो रबाडाची आयपीएल कारकीर्द कशी आहे?
दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज गेल्या हंगामापर्यंत पंजाब किंग्जचा भाग होता. त्याला जीटीने मेगा लिलावात १०.७५ कोटी रुपयांना सामील केले. रबाडा २०२२ ते २०२४ पर्यंत पंजाबकडून खेळला आहे. त्याआधी तो २०१७ ते २०२२ पर्यंत दिल्लीचा भाग होता. आतापर्यंत त्याने ८२ सामन्यांमध्ये ११९ विकेट्स घेतल्या आहेत.





