Gujarat serial killer : गुजरातमधील सिरियल किलर अखेर पोलिसांच्या ताब्यात; एका महिन्यात केले तब्बल ‘इतक्या’ महिलांचे खून

Gujarat serial killer – हरियाणातील रोहतक येथील रहिवासी राहुल करमवीर जाट याला गुजरातमधील वलसाड येथील वापी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. राहुल करमवीर जाट याच्यावर गुजरातमध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप होता. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता ते थक्क झाले. राहुल जाट या आरोपीने अनेकांची हत्या केली याची कल्पनाही पोलिसांना आली नव्हती.
आरोपींच्या चौकशीत अनेक नवीन गुपिते समोर आली. आरोपीने एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणखी किमान चार खून केले आहेत. त्यापैकी बहुतेक खून कार्समध्ये केल्र् आहेत. राहुल जाटला पकडण्यासाठी गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान 2,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पाचवीत नापास झाला असून त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
जेव्हा जेव्हा आरोपी विशेषतः महिलांना एकट्या दिसल्या तेव्हा तो त्यांना लुटायचा. त्यानंतर तो त्यांचा खून करायचा. तो महिलांवर बलात्कारही करायचा. विशेषत: अपंग प्रवाशांसाठी असलेल्या डब्यांमध्ये आरोपी घुसायचा. तो फिरत राहिल्याने आणि बहुतेक वेळेस रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये झोपत असल्याने त्याला पकडणे कठीण होते.
आरोपीने त्याच्या अटकेच्या एक दिवस आधी आणि नंतर आणखी चार खून केले होते. तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली. पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कटिहार एक्स्प्रेस ट्रेनमध्ये त्याने एका वृद्धाला भोसकले.
कैद्यांच्या राष्ट्रीय डेटाबेसवरून कळले की, आरोपीला या वर्षाच्या सुरुवातीला जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले होते. जिथे तो एका दरोड्याच्या प्रकरणात दाखल होता. जाटच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना सोडून दिले होते. इयत्ता 5 वी सोडल्यानंतर तो राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये विविध दरोड्यात सामील झाला. त्याच्यावर 13 एफआयआर दाखल आहेत.





