मुंबई – मार्वलचा सुपरहिट चित्रपट ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 3’ आता थिएटरनंतर OTT वर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी याचा दुसरा भाग थिएटर आणि ओटीटीमध्ये प्रसिद्ध झाला होता त्याला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आहे. थोर: लव्ह अँड थंडर नंतर, ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’ या चित्रपटाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
व्हॉल्यूम 3 मध्ये देखील इतर दोन चित्रपटांप्रमाणे क्विल मुख्य भूमिकेत आहे. ज्याचे पूर्ण जीवन या भागात दाखवण्यात आले होते. मार्वलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी हॉलिडे स्पेशल’ मध्ये क्विल त्याच्या टीमला ख्रिसमस पार्टी देण्यासाठी आणि त्याच्या आवडत्या गायकाचे अपहरण करण्यासाठी पृथ्वीवर कसे आणतो हे वैशिष्ट्यीकृत केले आहे. क्विलला त्याची बहीण सापडते, ज्यामुळे त्याला खूप आनंद होतो. या पार्टची कथा जेथे संपलेली तेथून व्हॉल्युम 3 ची कथा पुढे सुरु होत असल्याचे बोलले जात आहे. क्विल, नेबुला, ग्रूट, मेंडिस आणि ड्रॅक्स यांची भन्नाट दोस्ती यावेळी सर्वांना ओटीटीवर अनुभवता येणार आहे.
‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल 3’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा मार्वल चित्रपट अनेक प्लॅटफॉर्मवर VOD (व्हिडिओ ऑन डिमांड) वर प्रदर्शित होत आहे, परंतु हिंदीमध्ये हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार प्लसवर 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.