GT vs SRH : गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर नोंदवला एकतर्फी विजय, शुबमन गिलचे अर्धशतक

GT vs SRH Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad by 38 runs : गुजरात टायटन्सने मागील पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले आणि सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. यासह, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातने आयपीएल २०१५ मध्ये सातवा विजय मिळवला आणि पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात हैदराबदाचा संघ १८६ धावाच करु शकला.
गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी स्फोटक अर्धशतके झळकावली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाच्या आणखी एका शानदार स्पेलच्या मदतीने त्याने हैदराबादला १८६ धावांवर रोखले. शुबमन गिल (७६) आणि साई सुदर्शन (४८) यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी मिळून पॉवर प्लेमध्येच ८२ धावांची जबरदस्त भागीदारी केली. यादरम्यान, सुदर्शनने मोहम्मद शमीच्या फक्त एका षटकात ५ चौकार मारले. मात्र, तो अर्धशतक झळकावू शकला नाही.
That winning feeling 💙pic.twitter.com/I4SSCvwTKI
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 2, 2025
शुबमन गिलचे सलग तिसरे अर्धशतक –
Kaptaan, humaari jaan! 💙 pic.twitter.com/vRnd59aIGV
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 2, 2025
दरम्यान शुबमन गिलने २५ चेंडूत सलग तिसरे अर्धशतक झळकावले. पण गिल तिसऱ्या सामन्यात शतक ठोकण्याच्या जवळ पोहोचला होता. मात्र तो रनआऊट झाला. यानंतर जोस बटलर (६४) ने जबाबदारी घेतली आणि या हंगामात आणखी एक अर्धशतक ठोकले. त्यामुळे गुजरातने २२४ धावांचा मोठा डोंगर उभारला होता.
हेही वाचा – Shubman Gill Runout : शुबमन गिलच्या रागाच्या उद्रेकाने सामन्यात रंगत! वादग्रस्त रनआउटचा VIDEO व्हायरल
प्रत्युत्तरादाखल, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड (२०) यांनीही जलद सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन सलामीवीर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. पाचव्या षटकातच प्रसिध कृष्णाने त्याला बाद केले. इशान किशन (१३) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण अभिषेक शर्माने आणखी एक शानदार खेळी खेळली आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने संघाला सामन्यात टिकवून ठेवले. या हंगामात अभिषेक शर्माने ५० चा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ होती.
हेही वाचा – Virat Kohli : विराटला अवनीत कौरचा बोल्ड फोटो लाईक करणं पडलं महागात, द्यावं लागलं स्पष्टीकरण
प्रसिधने हैदराबादच्या डावाला लावला ब्रेक –
अभिषेक (७४) १५ व्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर पुढच्याच षटकात हेनरिक क्लासेन (२३) बाद झाला. यामुळे हैदराबादच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या आणि अखेर संपूर्ण संघ २० षटकांत फक्त १८० धावाच करू शकला. पुन्हा एकदा गुजरातचा गोलंदाज प्रसिध कृष्णा (२/१९) याने मधल्या षटकांमध्ये धावांचा प्रवाह रोखला आणि दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. या दारुण पराभवामुळे सनरायझर्स स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.





