Shubman Gill : ‘काही भावना व्यक्त…’, वादग्रस्त रन आऊटवर गिलने सोडले मौन, पंचाशी झालेल्या वादाबद्दल केला खुलासा

Shubman Gill expresses frustration on a controversial run-out decision : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२५ चा ५१ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात शुबमन गिल ७६ धावांवर रनआऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. परंतु, गिल अंपायरने दिलेल्या निर्णयावर खूश नव्हता. त्यामुळे सीमारेषेवर उपस्थित असलेल्या तिसऱ्या पंचाशी वाद घालताना दिसला. मात्र, या दरम्यान त्यांच्यात काय घडलं? याबद्दल गिलने सामन्यानंतर खुलासा केला.
सामन्यानंतर शुबमन गिल काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना शुबमन गिल म्हणाला, “माझ्या आणि पंचांमध्ये थोडीशी चर्चा झाली, कधीकधी खूप भावना गुंतलेल्या असतात. कारण तुम्ही तुमचे ११० टक्के देता, काही भावना असणे स्वाभाविक आहे.” या सामन्यात यजमान संघाने सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासह, संघ पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
https://twitter.com/77riccco/status/1918356620993863987
काळ्या मातीच्या खेळपट्टीवर षटकार मारणे सोपे नाही –
गुजरात टायटन्सच्या प्रभावी कामगिरीबद्दल बोलताना गिल म्हणाला, “ही निश्चितच योजना नव्हती. आम्ही निर्धारित २० षटकांमध्ये २२ डॉट बॉल खेळण्याबद्दल बोललो होतो. असो, काळ्या मातीच्या खेळपट्टीवर षटकार मारणे सोपे नाही, परंतु मी, साई आणि जोस ज्या पद्धतीने खेळतो, त्यावरून आम्हाला स्कोअरबोर्ड चालता ठेवण्याची समज आहे, असे मला वाटते.”
हेही वाचा – GT vs SRH : गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर नोंदवला एकतर्फी विजय, शुबमन गिलचे अर्धशतक
वादग्रस्त रन आउट प्रकरण काय होते?
What’s your take? 👇✍🏻#ShubmanGill seen having a word with the umpire after being given out by the third umpire on a tight call! 👀
Watch the LIVE action ➡ https://t.co/RucOdyBVUf#IPLonJioStar 👉 #GTvSRH | LIVE NOW on SS-1, SS- 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/TPiALXJu8O
— Star Sports (@StarSportsIndia) May 2, 2025
सामन्याच्या १३ व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या झीशान अन्सारीचा चेंडू जोस बटलरने शॉर्ट फाईन लेगकडे खेळला आणि लगेचच एक धाव घेतली, तेव्हा वाद सुरू झाला. दरम्यान, मैदानावर असलेल्या हर्षल पटेलने स्ट्रायकरच्या टोकावर एक वेगवान थ्रो मारला, जिथे यष्टिरक्षक हेनरिक क्लासेनने चेंडू स्टंपवर वळवण्याचा प्रयत्न केला. थर्ड अंपायर मायकल गॉफ यांनी अनेक वेळा रिप्ले पाहिल्यानंतर असा निर्णय दिला की चेंडू स्टंपला स्पर्श करून गेला होता, आणि क्लासेनच्या हातमोज्यांना स्पर्श झाल्यानंतर चेंडू त्याच्या हातातून निसटला असल्याचे दिसून आले. या निर्णयावरून गिल तिसऱ्या पंचांवर संतापला.





