Shubman Gill : पंचांशी वाद घातल्यानंतर शुबमनने अभिषेकला मारली लाथ, VIDEO होतोय व्हायरल

Shubman Gill Kick to Abhishek Sharma video viral : शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल खूप चर्चेत होता. त्याने प्रथम आपल्या दमदार खेळीने सर्वांच लक्ष वेधलं. त्यानंतर, तो एकदा नाही तर दोनदा पंचांशी वाद घालताना दिसला. एवढेच नाही तर यानंतर त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला लाथ मारताना दिसत आहे.
शुबमनने अभिषेक शर्माला मारली लाथ –
खरंतर, सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या १४ व्या षटकात खूप गोंधळ झाला. अभिषेकविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील करण्यात आले. यावर पंचांनी नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. यानंतर गुजरातने डीआरएस घेतला, बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू स्टंपवर आदळत असल्याचे दिसून येत होते. पण त्याचा परिणाम पंचांच्या निर्णयावर झाला. पण बॉल ट्रॅकिंग दरम्यान बॉल कुठे पिच होत आहे हे दाखवले जात नाही. यानंतर गोंधळ उडाला.
Subman Gill and Abhishek Sharma Funny moments #Abhishek#GTvsSRH #Gill pic.twitter.com/dcahauyeO6
— The KALKI 🗡️ (@TheKalkispeaks) May 2, 2025
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल पंचांशी वाद घालत होता. परंतु, त्यानंतर हैदराबादच्या अभिषेक शर्माने त्याला शांत केले. यानंतर, जेव्हा अभिषेक शर्मा जमिनीवर बसला होता आणि फिजिओ त्याच्याकडे पाहत होते, तेव्हा शुबमन गिल त्याच्याकडे आला आणि त्याने मस्करीत अभिषेकला लाथ मारली. दोघांमधील बाँडिंग खूप चांगले असून दोघे खास मित्र आहेत.
गुजरातने हैदराबादचा ३८ धावांनी केला पराभव
सामन्याबद्दल बोलायचे, तर हा यंदाच्या हंगामातील ५१ वा सामना होता. ज्यामध्ये गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. त्यांनी हैदराबादला २२५ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गुजरातचा संघ प्रत्युत्तरात १८६ धावांच करु शकला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावलं.





