Boxer Saweety Boora : बॉक्सर स्वीटी बुराकडून पती दीपक हुड्डाला मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

Boxer Saweety Boora hits husband Deepak Hooda video viral : सोमवारपासून आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बुरा आणि दीपक हुड्डा यांचे नाव मीडिया आणि सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. याचे कारण म्हणजे महिला पोलिस ठाण्यात स्वीटीने तिचा पती आणि माजी भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुड्डाला गळा दाबून मारहाण केल्याने चर्चेत आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यासोबत तिने दीपक हुड्डावर गंभीर आरोपही केले आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, पती-पत्नी दोघेही पोलिस स्टेशनमध्ये बसले आहेत. त्यानंतर कोणत्या तरी गोष्टीवरून दोघात वाद होतो. त्यानंतर स्वीटी रागाने उठते आणि पती दीपक हुड्डाचा गळा दाबून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान उपस्थित असलेले कुटुंबातील सदस्य त्यांचे भांडण सोडवतात. या घटनेनंतर दीपकने पत्नी स्वीटीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हा मुद्दा खूप चर्चेत आहे कारण स्वीटीने तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
स्वीटीने पती दीपकला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल –
Meet Haryana Boxer Saweety Boora beating her Asiad bronze winner kabaddi player husband Deepak Hooda inside a Police Station in Hisar. Both Saweety and Deepak are Arjuna awardee. Indian Men are neither Safe at Home nor inside the Police Stations nor in the Courts.
She lodged an… pic.twitter.com/0aIM3qv2Z1— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) March 24, 2025
माझ्या पतीला पुरुषांमध्ये रस – स्वीटी बुरा
स्वीटी बुरा ही हरियाणातील हिसार येथील आहे आणि ती एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर देखील आहे. तिने दीपक हुड्डावर गंभीर आरोप करत घटस्फोटाची मागणी केली आहे. स्वीटी बुरा म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे. कारण माझ्या पतीला पुरुषांमध्ये रस आहे. ही बातमी न्यूज १८ ने प्रमुखतेने प्रकाशित केली आहे. दीपक हुड्डा हे भाजप नेते आहेत. तसेच स्वीटी बोराने आरोप केला आहे की, तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणला जात आहे. सासरचे लोक महागडी गाडी मागत आहेत. इतकेच नाही तर स्वीटीने असेही म्हटले आहे की, तिचा पती देखील टॅक्स चुकवतो.
महिला बॉक्सर पुढे म्हणाली की, त्याचे वडील तिला मारहाण करतात. एकदा दीपकने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता आणि तिच्यावर खोटे खटलेही दाखल केले आहेत. त्याच वेळी, बॉक्सरचा पती दीपक हुड्डा यांनीही आपल्या पत्नीवर आरोप केले आहेत आणि म्हटले आहे की, स्वीटी बुरा आणि तिच्या कुटुंबाची नजर त्याच्या मालमत्तेवर आहे. यासोबतच त्याने स्वीटीने आपले डोके फोडल्याचा आरोपही केला आहे.





