दुसर्या सहामाहीत विकासदर वाढण्याची अपेक्षा; रिझर्व बँकेकडून वार्षिक विकास दर अंदाजात घट

मुंबई – पहिल्या दोन तिमाहीत भारताचा विकासदर खालावला आहे. मात्र दुसर्या सहामाहीत विकासदर वाढण्याची लक्षणे दिसून येत आहेत, असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले. मात्र रिझव्हर्र् बँकेच्या पत धोरण समितीने एकूण वर्षाचा विकासदर अंदाज पूर्वीच्या 7.2 सात टक्क्यावरून 6.6 टक्के इतका केला आहे.
पहिला तिमाहित विकासदर अपेक्षेेक्षा कमी म्हणजे 6.7% झाला होता. दुसर्या तिमाहित विकासदर त्यापेक्षा कमी होऊन 5.4% झाला आहे. याचा अर्थ पहिल्या सहा महिन्यातील विकासदर केवळ सहा टक्के आहे. दासांनी सांगितले की, काही क्षेत्रांमध्ये नकारात्मक घडामोडी घडत असल्या तरी काही क्षेत्रात तितकीच उमेद कायम आहे.
कृषी क्षेत्राचा विकासदर यावर्षी एकूण विकासदराला हातभार लावणार आहे. खरिपाचे विक्रमी पीक येणार आहे. रब्बीचे पीकही विक्रमी येणार आहे. सेवा क्षेत्राच्या उत्पादकतेवर आतापर्यंत तरी कसलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळे विकासदर जास्त प्रमाणात कोसळणार नाही. शिवाय सध्या असलेला भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त आहे. या परिस्थितीत कसलाही फरक पडलेला नाही. एकूण जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे विविध देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. त्याला भारत अपवाद होऊ शकत नाही असे समजले जाते.
पावसाळ्यात खान क्षेत्रावर आणि वीज निर्मिती क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत असतो. पावसाळा संपल्यानंतर या दोन्ही क्षेत्राची उत्पादकता वाढत असते.आता ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सांगितले की. महागाई देशातील आणि परदेशातील काही घटनांमुळे वाढली होती. त्यामुळेच व्याजदर उच्च पातळीवर कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महागाई इतर देशांपेक्षा नियंत्रणात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
व्याजदरात कपात केली नसली तरी विकास दराला चालना देण्यासाठी रिझव्हर्र् बँक इतर उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोख राखीव प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे बँका अधिक कर्ज वितरित करू शकणार आहेत. रिझव्हर्र्र् बँकेचे परिस्थितीकडे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात पतधोरण
-मुख्य व्याजदर रपो 6.5%
-आगामी काळात व्याजदर कपातीची शक्यता खुली
-रोख राखीव प्रमाणात अर्धा टक्के कपात
-बँकांना मिळणार 1.16 लाख कोटींचा निधी
-विकास दर अंदाज कमी करून 6.6%
-शेतीला तारणविरत कर्ज कर्ज दोन लाखापर्यंत
-लघु वित्त बँकांना युपीआयद्वारा कर्जपुरवठ्याची परवानगी
-ग्राहकांना माहितीसाठी रिझव्हर्र् बँक पॉडकास्ट सुरू करणार
-पुढील पतधोरण पाच ते सात फेब्रुवारीदरम्यान





