Govind Mundada : श्री तिरूपती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गोविंद मुंदडा यांची निवड
Govind Mundada : संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असून स्थापनेपासूनच संस्थेला सतत ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे.

Govind Mundada : दिनांक 15.04.2026 रोजी झालेल्या व्यवस्थापक समिती सभेमध्ये सन 2024-2027 सालाकरीता गोविंद मुंदडा यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
31 मार्च 2026 अखेर संस्थेचे भाग भांडवल 3 कोटी 44 लाख, ठेवी रू.137 कोटी 60 लाख, कर्ज वाटप 98 कोटी 12 लाख, गुंतवणुक 48 कोटी 54 लाख, खेळते भांडवल 165 कोटी 46 लाख एवढा आहे. संस्था आयएसओ 9001 : 2015 या मानांकनाने मानांकित असून संस्थेने कोअर बँकिंग हि सुविधा सुरू केलेली आहे.
संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा असून स्थापनेपासूनच संस्थेला सतत ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुगलकिशोर पुंगलिया हे असून उपाध्यक्ष म्हणून शाळीग्राम राठी व महाव्यवस्थापक म्हणून उमेश वाघे हे काम पाहात आहेत.





