बारामती विस्तारित नगरपालिकेच्या हद्दीत मळद येथे कृष्णा बागच्या प्लॉटिंगचे भूमिपूजन; मिळणार प्रशस्त, दर्जेदार सुविधा

माळेगाव – प्लाॅटिंग क्षेत्रात संपूर्ण पुणे, सातारा, नगर जिल्ह्यामध्ये नावलौकिक असलेल्या नवजीवन ग्रुपच्या बारामती नगरपालिका हद्दीमध्ये मळद येथे कृष्णा बाग नावाने प्लाॅटिंगचे भव्य भूमिपूजन पार पडले.
यावेळी नवजीवन उद्योग समूहाचे शितल आप्पा लोखंडे, कांताभाऊ काळे, जयदीप तावरे, संतोष जाधव, पंकज भोसले, विकास बाबर, हेमंत गरगटे, निलेश कोकरे, बाळासाहेब नलवडे, अमीर शेख, राहुल चव्हाण, मनोज कुंभार, विठ्ठल वाघमोडे उपस्थित होते. वेगाने विकसित होणाऱ्या बारामती नगरपालिकेच्या मळद या ठिकाणी वाढीव नगरपालिकामध्ये हा प्रकल्प असल्याने ग्राहकांची प्लॉट खरेदीसाठी मागणी वाढत आहे.
4,51,000 प्रतिगुंठा दर –
या प्लाॅटसाठी प्रतिगुठा चार लाख एकावन्न हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. आकर्षक प्रवेशद्वार, स्ट्रीट लाईट, वीज कलेक्शन सुविधा, ड्रेनेज सुविधा, २० फुटी अंतर्गत रस्ते, सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार, संपूर्ण प्रकल्पाला आकर्षण तार कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुविधा, रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण, ठिबक सिंचन यंत्रणा, सुसज्ज रस्ते आणि नागरी सुविधा, शाळा आणि हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर, अशा सर्व सुविधा असल्याने नागरिकांचा कल कृष्णा बाग प्लॉटिंगकडे वळत आहे.





