कश्मीरा शाह अडकली वाहतूक कोंडीत; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप

Kashmera Shah । मुंबईच्या रोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. याच वाहतूक कोंडीचा फटका आता अभिनेत्री कश्मिरा शाहला बसला आहे. नुकतंच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती कार चालवत असून रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे त्रासलेली दिसत आहे.
कश्मीरा शाहने मुंबईतील मालाड परिसरातील व्हिडीओ शेअर केला आहे. ती या ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकली आहे. ती म्हणते, ‘अरे काय यार, मालाड, मालवणी, मिथ चौकी इथे वाहतूक कोंडीत मी अर्ध्या तासापासून कारमध्ये बसले आहे. इतकं ट्रॅफिक? मालाडमध्ये इतके सगळे लोक आहेत? इतके लोक राहतात? कसे फिट होतात यार? काय आहे हे? वैतागले, फक्त १० इंच गाडी पुढे जातीये.”
View this post on Instagram
काश्मीराने कॅप्शन देत लिहिले, “या मालाडची काय अडचण आहे? तुम्हीही अशा वाहतूक कोंडीत अडकले आहात का? एक तर इतक्या वर्षांनी मालाडमध्ये आले आणि असं स्वागत?” तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लोकलमधून प्रवास करत जा, असा सल्ला देखील दिला आहे. तर काहींनी वाढत्या वाहतुक कोंडीच्या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा





