Pune District : चिंबळी ग्रामपंचायतीत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
Updated On:

चिंबळी : भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विधेची जननी व समस्या स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणा-या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चिंबळी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच ज्योती जैद, उपसरपंच राहुल चव्हाण, माजी उपसरपंच शिवाजी कड, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, चेतन बर्गे, काळूराम बनकर, गणेश सोनवणे, माजी सरपंच संगिता बनकर, राजश्री जैद, शीतल लोखंडे, शर्मिला कड, ज्योती जाधव, ग्रामपंचायत अधिकारी तुषार साळुंके, कर्मचारी हनुमंत बर्गे, भरत जैद, ज्ञानेश्वर पाटारे, छाया गायकवाड, स्वाती बनकर, सर्व सदस्य, सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





