राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
Updated On:

मुंबई : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव रविंद्र जगदाळे, उप सभापतींचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.






