पुण्यात राष्ट्रीय कला अकादमीकडून भव्य रांगोळी ; रांगोळीतून सामाजिक संदेश
Updated On:

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे.
दरम्यान, पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
राष्ट्रीय कला अकादमी कडून बेलबाग चौकात आणि अलका चौकात भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. दरवर्षी बेलबाग चौकात मानाच्या गणपतीसमोर रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळीतून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.





