Gramin News: डोर्लेवाडीतील राहत्या घरातून गायब झालेली मुलगी अखेर सापडली; डॉक्टर म्हणाले….

डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी या गावातील अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची घटना काल सोमवारी (ता. २० रोजी) घडली होती. नातेवाईकांनी अनेक ठिकाणी मुलीचा शोध घेतला मात्र तीस सापडले नाही अखेर त्या मुलीच्या आजोबाने बारामती शहर पोलिसात मुलगी गायब झाल्याची फिर्याद दाखल केली होती, त्यानुसार शहर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली अखेर आज ती मुलगी आता सापडली आहे. बारामती शहरात गायब झालेली मुलगी चक्कर येऊन पडली होती तिला नागरिकांनी शेजारील आटोळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केली तेथील डॉ प्रमोद आटोळे व डॉ. प्रियंका आटोळे या दापत्याने या मुलीवर वेळेवर प्राथमिक उपचार केले त्यांनतर शहर पोलिसांना खबर दिली.
आणि बारामती शहर पोलिसांनी त्या मुलीला बारामती एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती वैद्यकीय महाविद्यालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून सध्या तिची तब्बेत चांगली असून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राहत्या घरातून गायब झालेल्या मुलीने काल आणि आज बारामती-पुणे, पुणे-जेजुरी, जेजुरी-मोरगांव असा प्रवास केल्याची तिकिटे सापडली आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या मुलीला मनोसपचार तज्ञाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे सध्या त्या मुलीवर उपचार करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली असल्याचे मत पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितलेय.





