कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील सणसवाडी मधील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर रस्त्याच्या कामासाठी स्थानिकांच्या पाठ पुराव्यामुळे २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. रहदारीच्या सोयीसाठी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याने या रस्त्यासाठी भरघोस निधी दिल्याने सणसवाडी मधील नागरिकांनी आमदार अशोक पवारांचे आभार व्यक्त केले. आमदार अशोक पवारांच्या माध्यमातून सणसवाडी मध्ये आजवर अनेक विकासकामे करण्यात आली. आणि भविष्यातही नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामांवर भर दिला जाणार असून स्थानिकांनी देखील स्वतः लक्ष देऊन विकास कामे दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण व वेळेत पूर्ण होण्यासाठी बारकाईने लक्ष देण्याची गरज असून कामात हलगर्जीपणा चालणार नसून दर्जा व गुणवत्ता यांच्याशी तडजोड होणार नसल्याचे सांगत पवारांनी ठेकेदारालाही काम दर्जेदार करण्यासाठी सज्जड दम दिल्याचे दिसले. यावेळी सणसवाडी च्या सरपंच रुपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, पंडित दरेकर, दत्तात्रय हरगुडे, वैभव यादव, विजयराज दरेकर, गोरक्ष भुजबळ, सुनंदा दरेकर, शशिकला सातपुते, ललिता दरेकर यांसह डोंगरवस्ती, साईनाथ नगर, प्रियांका नगर, यादव वस्ती सह सणसवाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.