Sanjay Raut : “गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी मिळवलेला विजय ही रेजीम चेंजची सुरुवात”; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut : मोहन भागवत यांच्या भूमिकेचे स्वागत संजय राऊतांकडून कौतुक

Sanjay Raut : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांनी मोठे यश मिळवले. गोकुळ निवडणुकीत काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी १३ विरुद्ध १२ असे यश मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला.
यावरून उद्धवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली. गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांनी मिळवलेला विजय ही रेजीम चेंज म्हणजेच सत्ता परिवर्तनाची सुरुवात आहे, संजय राऊत म्हणाले.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्या मेळाव्यावरून मोहन भागवत यांच्या भूमिकेचे स्वागत केले. “सरसंघचालक मोहन भागवत परखडपणे बोलायला लागले आहेत. त्यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बोलावले, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.
हा परखड पणा कायम ठेवला तर देशाचा स्वाभिमान जागा राहील. धनखड यांना बोलावून संघाने दाखवले आहे की, त्यांचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे. मोहन भागवत यांचे हे कृत्य महत्त्वाचे असून त्यांचे आम्ही स्वागत करतो,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच जर मोहन भागवत यांनी हा परखडपणा कायम ठेवला तर नक्कीच रेजिम चेंज होईल, असेही ते म्हणाले.
तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलात का?
तर आजच्या दसऱ्या मेळाव्याबाबत संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. दुसऱ्या शिवसेनेचा निकाल लवकरच कळेल. मूळ शिवसेनेचा मेळावा आहे. परंपरेप्रमाणे उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील. रेजीम चेंजचा विषय आहे, त्याबाबत जो एल्गार आहे, तो शिवतीर्थावरून दिसेल. कोणताही पक्ष रस्त्यावर उतरतो, त्याचा हेतू परिवर्तन असतो. जे आकांड तांडव करत आहेत, त्यांना जावेच लागेल तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलात का?” असा सवाल करत संजय राऊतांना एकनाथ शिंदेंवर टीका केली.
टायगरचे वडील बोलत होते देश सुरक्षित हातात आहे, आता…
पुढे ते म्हणाले, “जनतेवर गोळ्या मारल्या तरी चालतील आणि बॉलिवूडला संरक्षण दिलं जातं. त्यांना संरक्षण देण्याची वेळ का येते? त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे. टायगरचे वडील बोलत होते देश सुरक्षित हातात आहे, आता त्यांनी म्हणावं. टायगरच्या घरी शिंदे गेले पण प्रदीप पूर्णेकरच्या घरी का गेले नाहीत?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. Sanjay Raut
Alia Bhatt: गुलाबी सिल्क साडी, निळा ब्लाऊज अन् गजरा! दुर्गापूजेत आलिया भट्टचा पारंपरिक लूक चर्चेत





