Gramin News : भाजपकडून सचिन आरडे यांना उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी

इंदापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान १३ एप्रिल ते २५ एप्रिल या दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर साजरे केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रदेश समिती गठीत केलेली असून, यामध्ये इंदापूर तालुक्यातील काटी गावचे भारतीय जनता पार्टीचे सचिन आरडे यांना उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी देण्यांत आली आहे.
एका लेखी पत्राद्वारे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट माधवी नाईक यांनी कळविले आहे. भारतीय जनता पार्टीने आठ सदस्यांची समिती गठीत केलेली असून, पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याला या समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
या अभियाना या अभियाना संदर्भात, बोलताना भाजप नेते सचिन आरडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तसेच पुतळा यांची स्वच्छता व सजावट करण्यात येणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्मारक उभा आहेत.येथे सार्वजनिक स्वच्छता राबवली जाणार आहे. डॉ.बाबासाहेबांचे जन्मस्थान, शिक्षण झालेली शहरे व त्यांचे वास्तव्य असणाऱ्या शहरांमध्ये त्यांच्या जीवन प्रवासात ज्या ठिकाणी विशेष कार्यक्रम केले अशा ठिकाणी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येणार आहे.
वैद्यकीय आघाडीच्या वतीने दलित वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिर भरवण्यांत येईल. प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये खाऊवाटप भेटवस्तू विद्यार्थ्यांना देण्यात येतील संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन सर्वत्र पार पडेल असे विविध कार्यक्रम कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवले जातील अशी माहिती, सचिन आरडे यांनी दिली.





