‘लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार..’ – अमोल मिटकरी

राजगुरूनगर – करोना काळात उद्धव ठाकरे घरात बसले होते. आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मंत्रालयात बसून राज्यातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार आहे. याची धास्ती महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक आमदार अमोल मिटकरी यांनी पाईट ता खेड येथे केली.
खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांची सभा पाईट (ता. खेड)आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील, कैलास सांडभोर, अरुण चांभारे, राम गावडे, शांताराम भोसले,दिलीप नाईकनवरे,शांताराम सोनवणे, गणेश सांडभोर,लता गोपाळे, कांचन ढमाले, मंगल चांभारे,दिलीप मेदगे, माजी सभापती कैलास लिंभोरे, अंकूश राक्षे, विलास कातोरे, विनायक घुमटकर, शांताराम चव्हाण, काळूराम सुपे,
संध्या जाधव,वैशाली जाधव, रमेश राळे, दशरथ गाडे,चांगदेव शिवेकर, जयसिंग दरेकर, विठ्ठल वणघरे, हनुमंत कड, जयसिंग भोगाडे, रणजित गाडे, विनोद टोपे, कमल कड, संजय रौंधल, विशाल पोतले, गणेश बोत्रे, सिध्दार्थ कांबळे, अभिजीत शेंडे, राम गोरे, सुभाष होले, मंगल भांगे, विजय करंडे, पंडीत रौंधळ, अश्विनी रौंधळ, रामदास खेंगले, रामदास शेलार, अनिल डांगले, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल मिटकरी म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतात की मी वारकरी आहे. “विरोधक उधारीचे जाळे”, वारकरी कधीही कुणाची उधारी ठेवत नसतो. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे लोक मुद्दामहून मातोश्री वरून खेड तालुक्यात पाठवले जातात. महाविकास आघाडीचे उमेदवार वारकरी असल्याचे सांगतात मात्र त्याच्यात वारकऱ्यांचा एकतरी गुण आहे का?..! संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे प्रवक्ते तालुक्यांत प्रचाराला आणता वारकरी संप्रदायातील कीर्तनकरांनी, वारकऱ्यांनी शपथ घेतली आहे. की त्या ज्या पक्षात आहे. त्या पक्षाला आम्ही मतदान करणारं नाही.
मिटकरी पुढे म्हणाले, मला कोल्हे म्हणू नका.! मी संभाजी महाराजांसारखा दिसत नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पक्षात प्रवेश दिला तिकीट दिले. निवडून आणले. तरीदेखील ते अजित पवार यांना सोडून गेले. मतदारांनो उधारिचे जाळे आणि विरोधक आणि त्यांचे मशाल चिन्ह या पासून तूम्ही सावध रहा. वारकरी कधी कॉन्ट्रॅक्टर नसतो. त्याच्याकडे चारचाकी गाड्या, डंपर नसतो. अशी टीका मिटकरी यांनी विरोधकांवर केली.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवाराने एकाच कामाची दोन वेळा बिले काढली. मी माजी सभापती काळूराम सुपे यांना विचारले की वाडा येथील गडदुबाई मंदीर येथे किती कामे झाली त्यांनी सांगीतले की एकच काम झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या नंतर हा माझ्याकडं आला आणि म्हणाला मला वाचवा. सायगाव येथील ठाकरवाडीच्या लोकांकडून काम करून घेतले पण पैसे दिले नाही.
राजगुरुनगर येथील मटण विक्रेत्याचे दीड लाख रुपये बुडवले. वारकरी कधी लोकांना कधी मटण खाऊ घालत नाही. असा खरपूस समाचार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत घेतला. दरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मुंबई डबेवाला संघटनेचे उल्हास मुके यांनी जाहीर पाठिंबा दिला. शरद बुट्टेपाटील, दिलीप मेदगे, अंकूश राक्षे, रमेश राळे, माणिक कदम, शिवाकाली खेंगले यांनी मगोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल डावरे यांनी केले तर आभार नंदकुमार साळुंके यांनी मानले.





