देशी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राचा पती आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक निक जोन्स् याची बॉलिवूडमधील अभिनेता गोविंदाशी तुलना करण्यात आली. यावर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सोशल मीडियावर सुरू असलेल्या कॅम्परिजनचे फोटो शेअर करत आपले म्हणणे मांडले आहे.
स्टोरीमध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये मरुन कलरच्या कोटमध्ये असलेल्या गोविंदाने येलो फ्रेम असलेला काळा चश्मा घातलेला आहे. याच फोटोशी मिळता-जुळता असता निकचा डार्क रेड कलरचा शर्ट आणि येलो फ्रेमचा गॉगल्समध्ये दिसतो.
हे फोटो शेअर करत निक म्हणाला की, “ऐक्युरेट’ (खरचं) . निकचा हा लुक 13 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या जोन्स् ब्रदर्सच्या “ऑनली ह्यूमन’ गाण्यातील आहे. या गाण्यात रेट्रो लुक आणि थीममध्ये तो शूट करण्यात आला आहे.
दरम्यान, जोन्स् ब्रदर्स म्हणजे निक आणि त्याचे भाउ जो जोन्स् आणि केविन जोन्स् हे सहा वर्षानंतर पुनरागमन करत आहेत. त्यांच्या कमबॅकचे चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत होत आहे. सध्या जोन्स् ब्रदर्स आपल्या आगामी अल्बमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.