Eid 2022 | ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
Updated On:

मुंबई :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना,दानधर्म तसेच परोपकाराचे महत्व अधोरेखित करतो. ईद उल फित्र (रमजान ईद) सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना, विशेषतः मुस्लिम बंधु -भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृध्दी घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.





