Manoj Jarange | Dhananjay Munde – माझ्या घातपाताचा कट रचणा-या मुख्य सूत्रधारालाच सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून बचाव करत असेल तर मला अशा सरकारचे पोलीस संरक्षण नको अशा अत्यंत कठोर शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. जरांगे यांनी बुधवारी अर्ज देऊन जालना पोलिस अधीक्षकांकडे आपले पोलीस संरक्षण तात्काळ काढण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आपला घातपात करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांवर जरांगे अजूनही ठाम आहेत. या कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशी आणि अटकेपासून वाचवत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धनंजय मुंडे यांना पूर्ण ताकतीने वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला दिलेले पोलीस संरक्षण नको, ते तात्काळ काढावे,असे त्यात म्हटले आहे.