सरकारी इंजिनिअरच्या घरावर धाड; पत्नीचा कारनामा पाहून अधिकारी चक्रावले…

Patna News | बिहारच्या ग्राम विकास विभागात काम करणाऱ्या इंजिनिअर विनोद कुमार रायच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली. यावेळी तब्बल 20 लाख रुपये जळालेले सापडले. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी EOU पथकाने विनोद कुमार राय यांच्या घरात प्रवेश करताच 35 लाखांची रोकड देखील सापडली.
याशिवाय कोट्यवधीच्या जमिनीचे कागदपत्रे, लाखोंचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. यात अवैध मार्गाने मिळवलेल्या कमाईतून सोन्याची बिस्किटे, लाखोंचे दागिने बनवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण ?
विनोद कुमारच्या पटना येथील भूतनाथ रोडवरील घरात कोट्यवधी रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा तपास यंत्रणेचे पथक विनोद कुमारच्या घरी पोहचले. परंतु पत्नीने उशिरापर्यंत दार उघडले नाही आणि आरडाओरड सुरू केली. Patna News |
विनोद कुमार यांच्या पत्नीने EOU च्या पथकाला छापा टाकण्यापासून अनेक तास रोखण्याचा प्रयत्न केला. रात्रभर अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घराबाहेर वाट पाहत राहिले. मात्र पहाटे 5 च्या सुमारास घरातून आगीचा धूर दिसू लागला तेव्हा तपास यंत्रणेचे पथक बळजबरीने घरात घुसले आणि समोरील दृश्य पाहून चक्रावले.
विनोद राय यांच्या पत्नीने घरात लाखांची रोकड जाळण्याकहा प्रयत्न केला. या नोटांना आग लावून त्या गटारात टाकण्यात येत होत्या. मात्र तातडीने घरातील सगळ्यांना ताब्यात घेत तपास यंत्रणेने आग विझवली. Patna News |
35 लाखांची रोकडसह कागदपत्रे, दागिने जप्त
त्यानंतर केलेल्या कारवाईत 35 लाखांची रोकड सापडली. तपासात कोट्यवधीचे जमीन व्यवहार केलेले कागदपत्रे, दागिने सापडले. या कारवाईवेळी विनोद कुमार यांना एका खोलीत नजरकैदेत ठेवले होते.
EOUने विनोद कुमार राय यांना अटक केली असून त्यांच्या पत्नीवरही कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे. याशिवाय या छापेमारीत आणखी बेकायदेशीर संपत्ती उघड होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
कोल्हापुरात दगडफेक, जाळपोळीच्या घटनेने एकच गोंधळ, दोन गट एकमेकांना भिडले, पोलिसही जखमी…





