‘गुगल’चे खास ‘डुडल’! २७ व्या वाढदिवसानिमित्त दिला जुन्या आठवणींना उजाळा…

Google 27th Birthday | गुगलने त्याच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त खास डुडल तयार केले आहे. हे डूडल गुगलचा पहिला जूना लोगो आहे, जे १९९८ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीची आठवण करून देते. हे खास डूडल अमेरिकन वापरकर्त्यांसह जगभरातील कोट्यवधी लोकांना आठवण करून देतं की, कॅलिफोर्नियातील एका छोट्याशा जागेमधून सुरू झालेली कंपनी आज तंत्रज्ञानातील सर्वात मोठी शक्ती कशी बनली आहे.
होमपेजवर दिलेल्या संदेशात गुगलने लिहिले आहे की, ‘आजचे डूडल गुगलचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. इतक्या वर्षांपासून आमच्यासोबत सर्च केल्याबद्दल धन्यवाद!’ १९९८ मध्ये जेव्हा लोक डायल-अप इंटरनेट आणि जड कॉम्प्युटर वापरत होते, तेव्हा कोणीही कदाचित विचार केला नसेल की एक दिवस सर्च इतकं जलद आणि सोपं होईल की मोबाइल फोनवर क्षणार्धात सर्व माहिती मिळेल.
Google ची सुरुवात कशी झाली?
Google ची अधिकृत स्थापना ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली होती. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी याची सुरुवात केली होती. त्यावेळी दोघेही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचे विद्यार्थी होते. दरम्यान, १९९८ मध्ये Google ची स्थापना झाली असली तरी, २००० च्या दशकापासून Google २७ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतो. कारण या दिवशी Google नं इंटरनेटवर विक्रमी संख्येनं पेजेस इंडेक्स केले होते.
आज Google ची मालकी Alphabet Inc. कडे आहे. २०१५ मध्ये अल्फाबेट नावाची एक होल्डिंग कंपनी तयार करण्यात आली होती, ज्या अंतर्गत Google च्या मुख्य सेवा आणि काही नवीन प्रयोग जसे वेमो (सेल्फ-ड्राइव्हिंग कार), वेरिली (हेल्थ टेक्नॉलॉजी) आणि एक्स रिसर्च चालवले जातात. अल्फाबेट एक पब्लिक कंपनी आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन आता Google च्या दैनंदिन कामांपासून दूर आहेत, परंतु ते अल्फाबेटचे बोर्ड मेंबर्स आहेत.
Googleची कमान सीईओ सुंदर पिचाई यांच्या हाती
Google आणि अल्फाबेटची कमान सध्या सीईओ सुंदर पिचाई यांच्या हातात आहे. ते कंपनीला नवीन दिशा देत आहेत, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कंप्युटिंग आणि हार्डवेअर सारख्या क्षेत्रांमध्ये ते कंपनीला एका वेगळ्या टप्प्यावर घेऊन जात आहेत. सुंदर पिचाई भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली Google नं अनेक नवीन तंत्रज्ञानावर काम केले आहे. सीईओ सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली, गुगल क्वांटम कॉम्प्युटिंग, ई-कॉमर्स आणि मशीन लर्निंगमध्येही दिवसेंदिवस प्रगती करत आहे. Google 27th Birthday|
Google चा लाँग फॉर्म काय ?
गुगलचे पुर्ण नाव “Global Organization Of Oriented Group Language Of Earth” हे आहे. गुगलचे डूडल हे सध्या सांस्कृतिक प्रतीक बनले आहेत. पहिले डूडल 1998 मध्ये तयार करण्यात आले होते. बर्निंग मॅन फेस्टिव्हलच्या स्मरणार्थ संस्थापकांनी स्टिक फिगर लोगोचा वापर केला. तेव्हापासून, डूडल अॅनिमेशन, परस्परसंवादी खेळ आणि प्रादेशिक कलाकृतींमध्ये विकसित झाले आहेत जे महत्त्वपूर्ण कामगिरी, शास्त्रज्ञ, कलाकार आणि जागतिक कार्यक्रम साजरे करतात. Google 27th Birthday|
हेही वाचा:
महाराष्ट्रावर अस्मानी संकट अन् मराठी कलाकार वेगळ्याच गोष्टीत दंग! सोशल मीडियावरून रोष व्यक्त





