महाराष्ट्रावर अस्मानी संकट अन् मराठी कलाकार वेगळ्याच गोष्टीत दंग! सोशल मीडियावरून रोष व्यक्त

Marathi artist : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अस्मानी संकट उद्भले असून अद्यापर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीये. मराठवाडा, विदर्भ, सोलापूर या ठिकाणी तर पावासाने हाहाकार केला आहे. अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे.
पूराच्या पाण्यात गावच्या गाव गेली आहेत. संसांर वाहून गेला. पीकं जमीनदोस्त झाली. बळीराजाच्या डोळ्यांत आसवांचा पाऊस सुरू झाला. जनजीवन विस्कळित झाले. काहींजण पाण्यात वाहून गेले. काही जण दगावले. जनावरे वाहून गेली असे सारं अनेकांची पदरी आले आहे. राज्यावर पावसाचे संकट असताना दुसरीकडे ज्या लोकांमुळे मराठी चित्रपट सृष्टी नावा रुपाला आली. तिचे मराठी कलाकार वेगळ्याच गोष्टींत दंग आहेत.
या भीषण परिस्थितीवर कोणताही कालकार बोलत नाही. (एकदोन सोडले तर) आज खरी गरज या माणसांना मदतीच आहे, पण मराठी कलाकार निसर्गाचा आनंद घेऊन ते सांगण्यात धन्यता मानतात. यामुळे कलाकारांच्या या भूमिकेवर सोशल मीडियावरून रोष व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी मंडळींनी नागरिकांच्या मदतीचे आवाहन केले पाहिजे, जमलं तर स्वतःताही सढळ हाताने मदत केली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाहीये, ही खरी शोकांतिका आहे.
मुद्दा महाराष्ट्रातल्या स्थितीमुळे तुम्ही कायम शोक करावा असा नाही पण तुमच्या भोवताली, तुमच्या लोकांसोबत इतकं दुःखद काहीतरी घडतंय आणि याच तुम्हाला सोयर सुतक सुद्धा नाही हा मुद्दा आहे. ज्या जनतेनी तुमच्यावर कलाकार म्हणून प्रेम केलं त्या जनतेच्या दुःखाची जाणीव तुम्हाला माणूस म्हणून नसणं हे लाजिरवाण आहे. यावर एकदा तरी मराठी कलाकारांनी विचार करावा…..
हेही वाचा : ‘उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय…’; भारताने पाकिस्तानची केली बोलती बंद





