‘Invest in our planet’: जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘गुगल’चा खास ‘डूडल’

नवी दिल्ली : पृथ्वी संरक्षणासाठी आणि पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे याची जाणीव व्हावी, म्हणून जागतिक वसुंधरा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस आपण जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा करतो. त्याच आजचा दिवस जगभरात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, गुगलने आज या संदर्भात खास गुगल डूडल बनवले असून पर्यावरण आणि पृथ्वीला वाचविण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठीच आजचे खास डुडल तयार करण्यात आले आहे.
आजच्या गुगल डूडलमधून अनोख्या पद्धतीने वसुंधराचे महत्त्व पटवून दिले आहे. आजच्या खास गुगल डूडलमध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे, याचे चित्रण केले आहे.
यंदा जागतिक वसुंधरा दिवसाची थीम आहे Invest in our planet. म्हणजेच आपल्या पृथ्वीवर चांगल्या गोष्टी इनवेस्ट करा ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार.
१९७० पासून वसुंधरा दिवस हा दरवर्षी २२ एप्रिलला साजरा केला जातो. पृथ्वी वाचावी, पृथ्वीवर होणारे प्रदुषण थांबावे, पृथ्वी आपली आई आहे आणि तिच्या रक्षणासाठी प्रयत्न करावे, हे उद्दीष्ट हा दिवस साजरा करण्यामागे असतो. जवळपास १९२ देश हा दिवस साजरा करतात.




