Want To Make Google Chrome Faster Enable This Setting Now : गुगल क्रोम जगातील अब्जावधी लोक वापरत आहेत. क्रोम हे सर्वात जास्त वापरले जाणारे ब्राउझर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ते डीफॉल्टनुसार Android उपकरणांसह येते. स्टॉक अँड्रॉइड फोनमध्ये, क्रोमशिवाय दुसरा ब्राउझर उपलब्ध नसतो. लोक स्मार्टफोनपासून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरपर्यंत क्रोम वापरत आहेत. तुमच्यापैकी बरेच जण क्रोम वापरतही असतील, परंतु काही वेळा क्रोम इतका स्लो होतो की ती एक समस्या बनते. Chrome टॅब देखील एका क्लिकने देखील बंद होत नाहीत. Chrome ब्राउझरमध्ये डीफॉल्ट स्वरूपात ‘Hardware acceleration’ हा आॅप्शन आॅफ असतो, परंतु तो आॅप्शन चालू करून तुम्ही Chrome ब्राउझरचे स्पीड वाढवू शकता. सहसा, Chrome ब्राउझर वेब पेज रेंडर करण्यासाठी आपल्या सिस्टमचा CPU आणि सॉफ्टवेअर वापरतो, परंतु ‘Hardware acceleration’ चालू केल्यानंतर, ब्राउझर आपल्या सिस्टमचे ग्राफिक्स कार्ड वापरण्यास सुरवात करतो, त्यानंतर क्रोमचा वेग (Speed) वाढतो. हे फिचर हेवी ग्राफिक्स असलेल्या बेवसाईट पेजसाठी सर्वोत्तम आहे. ‘Hardware acceleration’ क्रोम मध्ये कसे ON करावे? 1. सर्व प्रथम Google Chrome ब्राउझर उघडा. 2. आता उजव्या बाजूला दिसणार्या तीन डाॅटवर क्लिक करा. 3. आता खाली दाखवलेल्या ‘Settings’ बटणावर क्लिक करा. 4. यानंतर ‘System’ या पर्याया (Option) वर क्लिक करा. Instagram Update: लवकरच येणार नवं अपडेट! आता तुम्ही AI नं बदलू शकाल फोटोचं बॅकग्राउंड… 5. आता तुम्हाला ‘Use hardware acceleration when available’ चा पर्याय दिसेल. 6. हे आॅन(ON) करा. आता Chrome तुम्हाला री-लाँच करण्यास सांगेल. 7. री-लाँच करण्यासाठी ओके वर क्लिक करा. यानंतर तुमच्या क्रोम ब्राउझर स्पीड वाढेल.