AC Buying Guide: ऑनलाइन एसी खरेदी करताय? या ‘६’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
AC Buying Guide एसी खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोलीचा आकार. १०० ते १२० चौरस फूट खोलीसाठी १ टन एसी पुरेसा असतो. १२० ते १८० चौरस फूटसाठी १.५ टन आणि मोठ्या खोलीसाठी २ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेचा एसी निवडावा.

AC Buying Guide: उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरात एसी खरेदीची लगबग सुरू होते. वाढत्या उकाड्यामुळे अनेकजण नवीन एसी घेण्याचा विचार करतात. मात्र एसी हे महागडे उपकरण असल्याने ते खरेदी करताना योग्य माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः ऑनलाइन एसी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नंतर पश्चात्ताप होऊ शकतो.
रूमच्या आकारानुसार योग्य क्षमता निवडा AC Buying Guide
एसी खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोलीचा आकार. १०० ते १२० चौरस फूट खोलीसाठी १ टन एसी पुरेसा असतो. १२० ते १८० चौरस फूटसाठी १.५ टन आणि मोठ्या खोलीसाठी २ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेचा एसी निवडावा. चुकीची क्षमता घेतल्यास कूलिंग नीट मिळत नाही आणि वीज बिल वाढते.
विंडो की स्प्लिट एसी? AC Buying Guide
एसीचा प्रकार निवडताना आपल्या गरजा लक्षात घ्या. विंडो एसी स्वस्त आणि मेंटेनन्सला सोपा असतो. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी तो योग्य ठरतो. तर स्प्लिट एसी कमी आवाज करतो, दिसायला आकर्षक असतो आणि खिडकी नसलेल्या खोल्यांसाठी अधिक उपयुक्त ठरतो.

AC Buying Guide
इन्व्हर्टर एसी की नॉन-इन्व्हर्टर?
इन्व्हर्टर एसी विजेची ३० ते ५० टक्के बचत करतो. त्याचा कंप्रेसर गरजेनुसार वेग बदलतो, त्यामुळे दीर्घकाळासाठी तो अधिक किफायतशीर ठरतो. नॉन-इन्व्हर्टर एसी स्वस्त असला तरी वीज जास्त वापरतो.
स्टार रेटिंग महत्त्वाची
एसीच्या स्टार रेटिंगवरून त्याची ऊर्जा कार्यक्षमता ठरते. कमी वापरासाठी ३-स्टार एसी पुरेसा असतो. मात्र जास्त वापर असल्यास ५-स्टार एसी निवडल्यास वीज बिलात बचत होते.
इतर फीचर्सकडेही लक्ष द्या
कॉपर कंडेनसर असलेला एसी अधिक टिकाऊ आणि कार्यक्षम असतो. तसेच एअर फिल्टर, अँटी-बॅक्टेरियल फिल्टर आणि कमी आवाज असलेले मॉडेल निवडणे फायदेशीर ठरते. विजेच्या चढ-उतारापासून संरक्षणासाठी स्टेबलायझर वापरणेही आवश्यक आहे.
विश्वासार्ह ब्रँड आणि योग्य वेळ
एसी खरेदी करताना विश्वासार्ह ब्रँड निवडणे महत्त्वाचे आहे. डायकिन, एलजी, सॅमसंग, व्होल्टास आणि पॅनासोनिक यांसारखे ब्रँड लोकप्रिय मानले जातात. मार्च-एप्रिल किंवा सणासुदीच्या सेलमध्ये एसी घेतल्यास चांगल्या सवलती मिळू शकतात.
एकंदरीत, एसी खरेदी करताना घाई न करता योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेतल्यास तुम्हाला उत्तम कूलिंगसोबत पैशाचे पूर्ण मूल्य मिळू शकते.





