Phone charger electricity consumption: आपण सर्वजण रोज मोबाईल चार्ज करतो. पण एक सवय अनेकांकडे समान असते फोन चार्ज झाला की मोबाईल काढून घेतो, पण चार्जर मात्र प्लगमध्ये तसाच ठेवतो आणि स्विचही ऑनच ठेवतो. आपल्याला वाटतं की फोन जोडलेला नसल्यामुळे वीज खर्च होत नाही. मात्र, ही समजूत चुकीची आहे. Phone charger electricity consumption तज्ज्ञांच्या मते, प्लगमध्ये लावलेला चार्जर फोन नसतानाही थोडीफार वीज वापरत राहतो. यालाच “फँटम लोड” किंवा “स्टँडबाय पॉवर” असं म्हटलं जातं. म्हणजेच चार्जरमध्ये असलेला छोटा ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट सतत सक्रिय राहतात आणि वीज घेत राहतात. Phone charger electricity consumption एकट्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर हा खर्च खूपच कमी वाटतो. अंदाजानुसार, एक चार्जर दिवसभर प्लगमध्ये ऑन राहिला, तर तो सुमारे 7.2 वॅट म्हणजेच 0.072 युनिट वीज वापरतो. महिन्याभरात हा खर्च साधारण 1 ते 2 रुपयांपर्यंत येतो. त्यामुळे अनेकांना हा खर्च नगण्य वाटतो. Phone charger electricity consumption पण जेव्हा देशभरातील कोट्यवधी लोक हीच सवय पाळतात, तेव्हा चित्र पूर्णपणे बदलतं. रिपोर्टनुसार, भारतात या छोट्याशा निष्काळजीपणामुळे दरवर्षी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त वीज वाया जाते. म्हणजेच आपली एक साधी सवय देशाच्या ऊर्जा साधनांवर मोठा ताण आणते. वीज वाया जाण्याबरोबरच यामध्ये सुरक्षिततेचाही मुद्दा आहे. चार्जर सतत ऑन ठेवला, तर तो हळूहळू गरम होऊ शकतो. यामुळे ओव्हरहिटिंगचा धोका वाढतो आणि काही वेळा शॉर्ट सर्किट किंवा चार्जर खराब होण्याची शक्यता असते. विशेषतः स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाच्या चार्जरमध्ये हा धोका अधिक असतो. म्हणूनच तज्ज्ञ एक सोपी सवय लावण्याचा सल्ला देतात फोन पूर्ण चार्ज झाल्यावर फक्त मोबाईल काढून घेऊ नका, तर चार्जरचा स्विचही बंद करा. शक्य असल्यास चार्जर प्लगमधून पूर्णपणे काढून ठेवा. ही छोटी सवय तुमचा वीज बिल कमी करण्यात मदत करेलच, पण देशाची वीजही वाचवेल. आजच्या डिजिटल युगात मोबाईल वापर अनिवार्य आहे, पण त्यासोबत जबाबदारीने वागणंही तितकंच गरजेचं आहे. आपण केलेला छोटासा बदल मोठा परिणाम घडवू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी फोन चार्ज केल्यानंतर चार्जर काढून ठेवायला विसरू नका. Phone charger electricity consumption