नवी दिल्ली – जागतीक बाजारात दर घसरल्यामुळे भारतात सोन्याचे दर ( gold price today ) सोमवारी 104 रुपयांनी कमी होऊन 48,703 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. file photo त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचे दर 736 रुपयांनी कमी होऊन प्रति किलोला 62,621 रुपये झाले. file photo एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की डॉलर बळकट झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचा भारतातील दरावरही परिणाम झाला.