स्वच्छ पुण्यासाठी गोगटे शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवला “साखळी’ उपक्रम
Updated On:

पुणे : शहर स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी महापालिकेने सोमवारी शहरात स्वच्छता साखळी उपक्रमाचे आयोजन केले. या अंतर्गत नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सक्रीय सहभाग घेतल्याचे दिसून आले.
सोमवारी दुपारनंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल वाजवत “स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’ अशा घोषणा दिल्या. पारंपरिक पोषाखात सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांनी यावेळी मोठा उत्साह दाखवला. या उपक्रमात शाळेतील शिक्षकवृंद सहभागी झाले होते.





