राज्यात बकऱ्या चोरुन धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा सदस्य “जेरबंद’

Updated On:

पुणे – मागील दोन वर्षात पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसह राज्यभरात बकऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. बकरी चोरीला गेल्यावर मालक तक्रार करण्याच्या फंद्यात पडत नाही. ही संधी साधत बकरी चोरण्याचा सपाटाच कुरेशी गॅंगच्या नव्या सदस्यांनी लावला होता. या गॅंगचा एक सदस्य नुकताच खडकी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

त्याच्या चौकशीत पोलिसांनी तब्बल 36 चोरीची वाहने हस्तगत केली आहेत. त्याची किंमत 28 लाख 36 हजार इतकी आहे. या चोरीच्या वाहनांचा वापर करुन कुरेशी गॅंगने राज्यभरात धुमाकुळ घातला होता. ऍलेक्‍स लॉरेन्स ग्रॅम्स असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचे शिक्षण एसवाय पर्यंत झाले आहे. त्याच्या इतर चार साथीदारांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनाराच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना एक टोळी जेरबंद करण्यात आली होती. यावेळी ऍलेक्‍स हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्याचा माग काढत असताना, पोलिसांना दररोज त्याच्या कारनाम्याची नवनवी माहिती मिळत होती.

त्यानूसार त्याने अनेक वाहन चोरीचे व बकरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले. त्याला ताब्यात घेतले असता, तो कुरेसी गॅंगचा सक्रीय सदस्य असल्याची माहिती मिळाली. त्याने व त्याच्या साथीदारांनी अनेक जिल्हयातून गोठ्यात बांधलेल्या तसेच चरायला सोडलेल्या बकऱ्या चोरुन नेल्याचे उघड झाले. त्याने 50 पेक्षा जास्त वाहन चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे.

त्याने पुणे, पिंपरी-चिंचवड , सोलापूर, अहमदनगर व ईतर जिल्हयात गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून 26 दुचाकी, चारचाकी सहा, तिनचाकी चार अशा एकून 36 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहे. तर बकरी चोरीच्या चार गुन्हयासह त्याचे 40 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गायकवाड, पोलीस निरीक्षकशफिल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक प्रताप गिरी यांच्या पथकाने केले.

बकरीसाठी चोरीची गाडी –
कुरेशी गॅंग बकरी चोरीसाठी प्रथम वाहने चोरत होती. या चोरीच्या वाहनाचा वापर करुन पुणे,पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्हयातील ग्रामीण भागात जाऊन बकऱ्या चोरत होते. यानंतर चोरलेल्या गाड्यांचे नुकसान करुन त्या निर्जन ठिकाणी सोडत होते. चोरलेल्या बकऱ्या तातडीने कसायाला विकल्या जात होत्या.

आणखी संबंधित बातम्या

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई