Injury Replacement Rule : पंतच्या दुखापतीनंतर BCCI ने लागू केला नवा नियम, गंभीर दुखापत झाल्यास मिळणार बदली खेळाडू

BCCI introduces Serious Injury Replacement rule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) येत्या देशांतर्गत हंगामासाठी एक महत्त्वपूर्ण नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांतर्गत, मल्टी-डे सामन्यांमध्ये खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास संघाला त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला खेळवण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, एकदा बदललेला खेळाडू त्या सामन्यात पुन्हा सहभागी होऊ शकणार नाही.
नियम लागू करण्यामागील कारण काय?
हा निर्णय भारतीय संघाच्या अलीकडील इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-२ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे त्याला यष्टीरक्षण करता आले नव्हते.
The #RishabhPant effect.
From this season, starting from Duleep Trophy @BCCIdomestic introduces like for like replacement for external injuries. If there’s isn’t a reserve keeper in case of keeper getting injured, someone can be summoned from outside squad. pic.twitter.com/jhuDfwqvaA— Kushan Sarkar (@kushansarkar) August 16, 2025
या घटनेनंतर गंभीर दुखापतीच्या परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडू बदलण्याची मागणी जोर धरू लागली होती. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ डोक्याच्या दुखापतीच्या (कनकशन) बाबतीतच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडू बदलण्याची परवानगी आहे. आता बीसीसीआयने हा नियम देशांतर्गत क्रिकेटसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Irfan Pathan : ‘आम्हाला जणू मेल्यासारखं वाटतं होतं…’, इरफान पठाणने सांगितला टीम इंडियाचा सर्वात वाईट काळ
अंपायरांना कार्यशाळेत दिली माहिती –
🚨 NEW RULE 🚨
BCCI introduces ‘Serious Injury Replacement’ rule for 2025-26 season in multi-day formats, allowing a like-for-like replacement – somewhat similar to concussion replacement – in case of a major injury to any player.#CricketTwitter pic.twitter.com/C9WGOEHyh9
— Cricbuzz (@cricbuzz) August 16, 2025
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या अंपायरांच्या कार्यशाळेत बीसीसीआयने या ‘इंजरी रिप्लेसमेंट’ नियमाची माहिती दिली. क्रिकबझच्या अहवालानुसार, हा नियम केवळ मल्टी-डे सामन्यांसाठी लागू असेल. खेळाडू बदलण्याचा निर्णय मैदानी पंच आणि सामना पंच यांच्या मंजुरीनंतरच घेतला जाईल. दुखापत ही चेंडू लागणे, हाड मोडणे किंवा सांधा निखळणे यासारख्या गंभीर स्वरूपाची असावी, ज्यामुळे खेळाडू पुढे सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.
विशेष म्हणजे यासाठी सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना बदली खेळाडूंची यादी द्यावी लागेल, जेणेकरून समान भूमिका असलेल्या खेळाडूलाच संघात स्थान मिळेल. हा नियम देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक सुरक्षितता आणि लवचिकता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.





