Suryakumar Yadav : आशिया कपपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! धडाकेबाज खेळाडू फिटनेस टेस्ट झाला पास

जूनमध्ये झाली होती हर्नियाची शस्त्रक्रिया –
आता तो आशिया कपच्या संघ निवडीसाठी मुंबईत होणाऱ्या बैठकीत अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीसोबत चर्चा करणार आहे. सूर्यकुमार यादवने अखेरचा सामना आयपीएल 2025 मध्ये खेळला होता, जिथे त्याला ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे ‘स्पोर्ट्स हर्निया’वर शस्त्रक्रिया केली होती.
आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणार –
Suryakumar Yadav has cleared his fitness test and will be present in the selection meeting on Tuesday to pick India’s squad for the Asia Cup 2025.#AsiaCup #SuryaKumarYadav #TeamIndia pic.twitter.com/stQD8NHfpB
— Circle of Cricket (@circleofcricket) August 16, 2025
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर खेळात पुनरागमनासाठी (रिटर्न टू प्ले-आरटीपी) फिटनेस टेस्ट अनिवार्य आहे. सूर्यकुमारने ही टेस्ट पास केली असून कर्णधारपदावरील संशयही संपुष्टात आला आहे. आता सूर्यकुमारच आशिया कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान यूएईमध्ये आयोजित होणार आहे. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरला यजमान यूएईविरुद्ध करणार आहे, तर 14 सप्टेंबरला दुबईत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.
आयपीएल 2025 मध्ये केली होती दमदार कामगिरी –
34 वर्षीय सूर्यकुमारने आयपीएल 2025 मध्ये शानदार कामगिरी करत 717 धावा केल्या होत्या. यासह तो सचिन तेंडुलकरनंतर मुंबई इंडियन्ससाठी एका हंगामात 600 हून अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. ‘ऑरेंज कॅप’ विजेता गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन (759 धावा) याच्यापेक्षा तो थोडा मागे राहिला. सूर्यकुमारच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यांनी एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केले, परंतु दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला.





