Commonwealth Games 2026 : १२६ भारतीय शिलेदार, ८ खेळ अन् ‘मिशन २०३०’! ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी भारताचा मोठा मास्टरप्लॅन समोर
Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत २३ व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Commonwealth Games 2026 Glasgow India Squad 126 Athletes : फिफा फुटबॉल विश्वचषक संपून अवघे दोन दिवस झाले असतानाच आता जगभरातील क्रीडाप्रेमींना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) वेध लागले आहेत. स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत २३ व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारताचे १२६ खेळाडू सहभागी होणार असून आठ वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करण्यासाठी मैदानात उतरतील.
खेळांची संख्या घटली, तरी पदकांची आस –
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवून केवळ १० खेळांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. खर्च आवाक्याबाहेर गेल्याने आणि वेळेअभावी बॅडमिंटन, हॉकी, क्रिकेट, कुस्ती, टेबल टेनिस यांसारखे भारताचे पदक मिळवून देणारे प्रमुख खेळ वगळण्यात आले आहेत. तरीही ॲथलेटिक्समध्ये नीरज चोप्रा, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू आणि बॉक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहीन यांच्याकडून भारताला मोठ्या पदकांच्या अपेक्षा आहेत. भारताचे पथक प्रमुख (चीफ दी मिशन) रोहित राजपाल यांनी स्पष्ट केले की, काही मुख्य खेळ नसल्यामुळे बर्मिंगहॅम २०२२ च्या (६१ पदके) तुलनेत यंदा पदकांची संख्या थेट पडताळणे अयोग्य ठरेल.
२०३० च्या स्पर्धेचे आयोजन अहमदाबादमध्ये होणार!
⏳ Only 1 day left for the Commonwealth Games 2026! 🇮🇳🇮🇳 The countdown is almost over. Time for Team India to chase Commonwealth glory! 💙🏅
All the best, champions! Let the medal hunt begin! 🏅🔥 pic.twitter.com/gvGwp95meJ
— Khel Now (@KhelNow) July 22, 2026
भारताला २०३० मधील शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून ही स्पर्धा अहमदाबाद येथे होणार आहे. त्यामुळे यंदा ग्लास्गोमध्ये केवळ पदके जिंकणे नव्हे, तर क्रीडा व्यवस्थापनाचा अनुभव घेणेही भारतासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. गेम्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, एकात्मिक नियंत्रण कक्ष आणि लॉजिस्टिक्सचा अभ्यास करण्यासाठी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि गुजरातचे मुख्यमंत्री ग्लास्गोमध्ये उपस्थित राहणार आहेत.
खेळाडूंच्या राहण्याची आणि भारतीय जेवणाची विशेष सोय –
Best wishes to Team India’s Commonwealth Games 2026 contingent! 💙
As our athletes step onto the global stage, they carry with them the hopes of a billion hearts. May your determination, resilience, and passion lead you to new heights.
Go out there, give it your all, and make… pic.twitter.com/8J0BHbtrMl
— SAI Media (@Media_SAI) July 22, 2026
ग्लास्गोतील चार प्रमुख ठिकाणांवर ही स्पर्धा होणार असून खेळाडूंसाठी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय केली आहे. तसेच भारतीय खेळाडूंसाठी रात्रीच्या वेळी खास भारतीय जेवणाची सोय करणाऱ्या उपाहारगृहांची निश्चिती करण्यात आली आहे.


